ऐकावं ते नवलच! 'या' स्टॉलवर मिळतो '24 कॅरेट सोन्याचा चहा'; Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 12:23 PM2023-05-01T12:23:08+5:302023-05-01T12:35:19+5:30

काही लोक चहाचे शौकीन असतात. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते.

video of 24 carat gold chai viral on social media 24 carat chai on lucknow eatery watch where to find | ऐकावं ते नवलच! 'या' स्टॉलवर मिळतो '24 कॅरेट सोन्याचा चहा'; Video तुफान व्हायरल

ऐकावं ते नवलच! 'या' स्टॉलवर मिळतो '24 कॅरेट सोन्याचा चहा'; Video तुफान व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर अनेक हटके गोष्टी या व्हायरल होत असतात. अशीच एक भन्नाट गोष्ट आता समोर आली आहे. काही लोक चहाचे शौकीन असतात. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. पण आजकाल चहावर वेगवेगळे प्रयोग होत आहेत. यामध्ये नवनवीन फ्लेवर्स आणि स्टाइल्ससाठी प्रयत्न केले जात आहेत. असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर येत असतात. असाच एक व्हिडीओ लखनौच्या एका फूड ब्लॉगरने शेअर केला आहे, ज्यावर नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडिओमध्ये एका चहाच्या स्टॉलवर सोन्याच्या फॉइलसोबत चहा दिला जात आहे. याच्या कॅप्शनमध्ये प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर रिची रिचला टॅग करण्याचा सल्ला देऊन लिहिले होते, Tag a Richi Rich, who can try this. अफाट संपत्ती असलेल्या रिची रिचकडे सर्व काही सोन्याचं होतं. या गोल्ड कॅरेट चहाची किंमत 150 रुपये असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ पेपर कपमध्ये चहा ओतणे आणि त्यात मलई घालून सुरू होतो. यानंतर त्यावर सोन्याचे फॉइल काळजीपूर्वक लावलं जातं.

Eattwithsid अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ सहा हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही य़ुजर्स हसरा चेहरा आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत आणि मस्त असल्याचं म्हणत आहेत, तर काही म्हणतात की हे काहीही आहे. एका युजरने याला धोकादायक देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: video of 24 carat gold chai viral on social media 24 carat chai on lucknow eatery watch where to find

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.