Video - 26 लग्न, 22 तलाक... 'या' व्यक्तीला गाठायचंय 100चं टार्गेट; नातीच्या वयाच्या आहेत बायका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 03:58 PM2023-02-22T15:58:53+5:302023-02-22T16:13:22+5:30

व्यक्तीने 26 लग्न केली आहेत आणि 22 वेळा तलाक घेतला आहेत.

Video pakistani man set target of 100 marriage reached 26 with many talaq | Video - 26 लग्न, 22 तलाक... 'या' व्यक्तीला गाठायचंय 100चं टार्गेट; नातीच्या वयाच्या आहेत बायका

Video - 26 लग्न, 22 तलाक... 'या' व्यक्तीला गाठायचंय 100चं टार्गेट; नातीच्या वयाच्या आहेत बायका

googlenewsNext

जगात असे काही लोक आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्ही कधीच कल्पनाच करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या व्यक्तीने 26 लग्न केली आहेत आणि 22 वेळा तलाक घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 100 वेळा लग्न करण्याचं टार्गेट ठेवल्याचं तो आता सांगत आहे. एका पाकिस्तानी यूट्यूबरने त्याची मुलाखत घेतली आणि त्यातून त्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, activistjyot यावरून ज्योत जीत नावाच्या युजरने त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती आपल्या तरुण पत्नींसोबत बसला आहे. यावेळी त्याच्या चार बायका दिसत आहेत. त्यांचे वय 19-20 वर्षांच्या आसपास असल्याचे त्याने स्वतः सांगितले. मुलाला जन्म दिल्यानंतर तो त्यांनाही सोडून जाईल, असे तो म्हणत आहे. त्याने ही गोष्ट आधीच बायकांच्या पालकांना सांगितली आहे. तो फक्त तलाक देण्यासाठी लग्न करतो आणि मुलीही त्या माणसाशी लग्न करायला तयार होतात. 

आतापर्यंत 26 विवाह केले असून 22 तलाक घेतले आहेत. 100 लग्नं करून 100 तलाक देण्याचं त्याचं टार्गेट आहे. इतकच नाही तर त्याची एकूण 22 मुलं आहेत, जी त्यांच्या आईसोबत राहतात. तलाकनंतर पत्नींना राहण्यासाठी त्याने घर आणि खर्चही दिला असल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर तलाक घेणे हा त्यांचा छंद आहे. यात कोणतीही अडचण नसल्याचे त्याचे मत आहे.

ही व्यक्ती कोण आहे, त्याचे नाव काय आणि पाकिस्तानचे हे कोणते शहर आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. लोक या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्य़ानंतर लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Video pakistani man set target of 100 marriage reached 26 with many talaq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.