VIDEO:...जेव्हा माणूस किंग कोब्राला पाजतो पाणी
By admin | Published: March 30, 2017 01:04 PM2017-03-30T13:04:00+5:302017-03-30T13:04:13+5:30
एरव्ही भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळवणा-या कोब्राला वन्यजीव बचाव कार्यकर्त्याने बाटलीने पाणी पाजलं
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 30 - जगातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जाणारा किंग कोब्रा तसा सामान्य वस्तीपासून दूरच असतो. मात्र काही दिवसांपुर्वी एका तहानलेल्या कोब्राने पाण्याच्या शोधात कर्नाटकमधील कैगा गाव गाठलं. एरव्ही भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळवणा-या कोब्राला मात्र येथील वन्यजीव बचाव कार्यकर्त्याने बाटलीने पाणी पाजलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोब्रानेही कोणतीही हालचाल न करता शांतपणे पाणी पित आपली तहान भागवली. माणसाच्या हातून पाणी कोब्रा पाणी पिण्याची ही घटना तशी दुर्मिळच म्हणावी लागेल.
कर्नाटकात सध्या दुष्काळ पडला असून पाण्यासाठी लोकांना दूर दूरपर्यंत भटकावं लागत आहे. जिथे माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तिथे मुक्या प्राण्यांचं काय होत असेल. अशाच एका तहानलेल्या किंग कोब्राने पाण्याच्या शोधात कैगा गावात प्रवेश केला. तेथील वन्यजीन बचाव कार्यकर्ता कोब्राला पाणी पाजत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH: Drought-hit villagers in Karnataka"s Kaiga made King Cobra drink water from a bottle (March 24th) pic.twitter.com/SVEvg4GUKD
— ANI (@ANI_news) March 30, 2017
या व्हिडीओमध्ये सुरुवातीला हा अधिकारी पाणी पाजण्याआधी कोब्राची शेपूट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरुन आपल्यावर हल्ला होऊ नये. मात्र नंतर कोब्राचं संपुर्ण लक्ष पाण्याकडे असल्याचं पाहून त्याचीही गरज भासली नाही. अधिका-याची सर्वजण स्तुती करत असून ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाणी पाजल्यानंतर कोब्राला प्राणी सुरक्षा विभागात नेण्यात आलं.