Video - भैया से सैया! 8 वर्षे ज्याला भाऊ म्हटलं त्याच्याशीच 'तिने' लग्न केलं; लोक म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:06 AM2023-04-15T11:06:57+5:302023-04-15T11:14:57+5:30
ऑनलाईन व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने भाऊ म्हणणाऱ्या पुरुषाशी लग्न केलं आहे.
भारतीय शहरं आणि गावांमध्ये, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला "दादा" किंवा "ताई" म्हणणे सामान्य आहे. मोठ्या भावासाठी "दादा" हा शब्द वापरला जातो आणि मोठ्या बहिणीसाठी "दीदी" हा शब्द वापरला जातो. पण आता एक हटके घटना समोर आली आहे. एका तरुणीने ज्याला आठ वर्षे भाऊ मानलं त्याच्याशीच लग्न केलं आहे. ऑनलाईन व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने भाऊ म्हणणाऱ्या पुरुषाशी लग्न केलं आहे.
विनी नावाच्या महिलेने वयाच्या अंतरामुळे 8 वर्षांपासून जयला "भाऊ" म्हटले. ते दोघेही नातेवाईक असल्याचेही त्यांनी सांगितले. हा व्हायरल व्हिडिओ विनी आणि जयच्या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. क्लिपमध्ये, जोडपे अगदी लहान असताना एकत्र पोज देताना दिसत आहेत. विनीने असेही सांगितले की तिने जयशी लग्न केले आहे आणि आता त्यांना एक मूलही आहे. बाळाचा फोटोही रीलमध्ये दिसत आहेत.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आम्ही नातेवाईक आहोत आणि आमच्या वयातील अंतरामुळे मी त्यांना वर्षानुवर्षे भाऊ म्हणत होते. आता भैया से सैया." ऑनलाईन शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ जवळपास 5 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. आणि सोशल मीडिया युजर्सनीही या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. जे पाहून हे स्पष्ट होते की लोक या महिलेच्या या गोष्टीवर फारसे खूश नव्हते.
एका युजरने लिहिले की, "हा विनोद नाही. मला विचित्र वाटत आहे." दुसर्या युजरने कमेंट केली की, "भाऊ म्हणणे म्हणजे नाते नाही! जो तुमच्यापेक्षा मोठा असेल त्याला भाऊ म्हणता येईल! पण जगाला सांगायची गरज नव्हती, फारसे आवडले नाही." सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"