Video : मुंबईतील नेस्को कोविड केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 11:15 PM2021-06-03T23:15:39+5:302021-06-03T23:17:00+5:30

नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरला हा व्हिडीओ. नेटकऱ्यांनीही मानले दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार.

Video: 'Zingat' dance of health workers on the occasion of Nesco Centre's anniversary | Video : मुंबईतील नेस्को कोविड केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स

Video : मुंबईतील नेस्को कोविड केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स

googlenewsNext
ठळक मुद्देनेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरला हा व्हिडीओ.नेटकऱ्यांनीही मानले दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला होता. परंतु आता यातून महाराष्ट्र सावरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढणारी रूग्णसंख्याही आता कमी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को कोविड सेंटरला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. दरम्यान, नेस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमादकम्यान आरोग्य कर्मचारी झिगाट या गाण्यावर थिरकताना दिसले.
 
मुंबईतील नेस्को कोविड सेंटर सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरम्यान,२ जून रोजी नेस्को कोविड सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी झिंगाट या गाण्यावर थिरकताना दिसले. 



गेल्या दीड वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमामात ताण येत आहे. आरोग्य कर्मचारी दिवसरात्र एक करून रुग्णांवर उपचार करताना दिसत आहेत. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. नेस्कोतील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दिवसरात्र सुरू असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले.

Web Title: Video: 'Zingat' dance of health workers on the occasion of Nesco Centre's anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.