विजय मल्ल्या यांचे खाजगी विमान भंगारात
By admin | Published: April 20, 2015 12:20 AM2015-04-20T00:20:00+5:302015-04-20T00:20:27+5:30
उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकीची किंगफिशर विमान कंपनी कर्जाच्या गर्तेत अडकून बंद पडल्यानंतर आता, कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्या खाजगी जेट विमानाचाही
मुंबई : उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकीची किंगफिशर विमान कंपनी कर्जाच्या गर्तेत अडकून बंद पडल्यानंतर आता, कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्या खाजगी जेट विमानाचाही लिलाव झाला असून हे विमान भंगारात विकण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली व सायलंट एन्टरप्राईजेस या कंपनीने हे विमान विकत घेतले.
या विमानाची डागडुजी करून ते पुन्हा हवाई सेवेत आणण्यापेक्षा ते मोडून भंगारात विकल्यास अधिक पैसे मिळतील, हे लक्षात आल्यानंतर हे विमान भंगारात काढण्यात आहे. सुमारे साडे सहा टन इतका पत्रा व अन्य सामान यातून निघाले असून याद्वारे कंपनीला २२ लाख रुपये मिळाल्याचे वृत्त आहे.
सहा एप्रिल रोजी या विमानाची मोडतोड करून पत्रा काढण्यास सुरुवात झाली असून आता काम शेवटच्या टप्प्यात आहे. (प्रतिनिधी)