या गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:02 PM2018-11-08T13:02:25+5:302018-11-08T13:03:40+5:30
देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे.
देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच उत्साह आहे. पण भारतात असंही एक गाव आहे जिथे गेल्या २०० वर्षांपासून दिवाळी साजरीच केली जात नाही. यामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
हे गाव आंध्र प्रदेशातील पोन्नान पालेम गाव आहे. गाववाले सांगतात की, २०० वर्षांपूर्वी गावात एका मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाला होता. इतकेच नाही तर नाग पूजेच्या दिवशी दोन बैलांचा मृत्यू झाला होता. गावातील लोकांमध्ये यामुळे असा समज पसरला की, दिवाळी साजरी केल्यामुळेच या घटना घडल्या. मग काय तेव्हापासून या गावात दिवाळी साजरी करण्यावर बंदी आहे.
आणखी महत्त्वाची गोष्टी या गावातून लग्न होऊन ज्या महिला दुसऱ्या गावात गेल्या आहेत. केवळ त्यांनाच दिवाळी साजरी करण्याची मुभा आहे. पण या गावात लग्न होऊन आलेल्या महिलांना दिवाळी साजरी करण्यास बंदी आहे.
गावातील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने सांगितले की, 'मी १२ वर्षांची असेपर्यंत दिवाळी साजरी करत होते. पण मग नंतर मी होऊन या गावात आले आणि तेव्हापासून मी दिवाळी साजरी केली नाही'. पण तब्बल २०० वर्षांपासून हा नियम पाळला जाणे खरंच आश्चर्यकारक आहे. कारण आजकालचे तरुण हे आपल्या मनाने जगणे पसंत करतात.
गावातील एका व्यक्तीने सांगितले की, '१२ वर्षांपूर्वी मी गावातील ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला होता. मी माझ्या परिवारासोबतच दुसऱ्या परिवारांनाही दिवाळी साजरी करण्यासाठी प्रेरित केले होते. पण उत्सव साजरा केल्यानंतर काही वर्षांनी माझ्या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हाही गावातील लोकांनी दिवाळी साजरी केल्याने असे झाल्याचे मानले'.