सुंदर आणि हॉट असूनही येथील तरूणींना मिळत नाहीये नवरदेव, वाट बघून बघून थकल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 03:39 PM2023-06-16T15:39:58+5:302023-06-16T15:46:02+5:30
Brazil Village Story : महिलांना लग्न करण्यासाठी मुलं मिळत नाहीयेत. या गावातील सुंदर महिला त्यांच्या लाइफ पार्टनरच्या शोधात आहेत. पण त्यांची ही ईच्छा पूर्ण होत नाहीये.
Brazil Village Story : जगभरातील देशांची लोकसंख्या वेगवेगळी आहे. चीन हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश तर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश मानला जातो. कुठे मुलींची संख्या कमी तर कुठे मुलांची संख्या जास्त आहे. जगात असाही एक असा देश आहे की, जेथील महिलांना लग्न करण्यासाठी मुलं मिळत नाहीयेत. या गावातील सुंदर महिला त्यांच्या लाइफ पार्टनरच्या शोधात आहेत. पण त्यांची ही ईच्छा पूर्ण होत नाहीये.
ब्राझीलच्या (Brazil) नोइवातील एका गावातील ही कहाणी आहे. हे गाव देशातील उंच डोंगरांवर वसलं आहे. इथे फार सुंदर महिला आहेत आणि त्यांना अविवाहित पुरूषांचा शोध आहे. या गावात साधारण 600 महिला राहतात. त्या पुरूषांना लग्नासाठी पैसेही देण्यास तयार आहेत. तरीही त्यांचं लग्न होत नाहीये. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिला जिथे राहतात तिथे मुलं आणि मुलींच्या संख्येत मोठा फरक आहे. इथे मुलांची संख्या फार कमी आहे. हेच कारण आहे की, मुलींना त्यांच्या स्वप्नातील राजकुमार मिळत नाहीये. या गावात कुणी तरूण असेलही तर तो या गावात राहत नाही. ते शहरात निघून जातात. त्यामुळे महिला गावात एकट्या राहतात. हेच कारण आहे की, ब्राझीलच्या या गावात महिला साथीदाराची वाट बघत आहेत.
ब्राझीलच्या या गावात मुलींची संख्या जास्त असल्याने प्रभावही जास्त त्यांचाच असतो. याच कारणामुळे येथील पुरूष येथील महिलांसोबत राहणं पसंत करत नाहीत. गावातील लोकांकडे मुख्यत्वे शेती आणि पशुपालन हेच काम आहे. ही सगळी कामे महिलाच करतात. त्यामुळे गावातील पुरूष कामाच्या शोधात शहरात जातात.
रिपोर्टनुसार, गावातील नियम आणि कायद्यांमुळे पुरूष इथे जास्त राहत नाहीत. महिलांचं मत आहे की, पुरूषांनी लग्न करून त्यांच्यासोबतच गावातच रहावं. तसेच गावातील नियम आणि कायद्यांचं पालन करावं. जे खूप आधीपासून पाळले जातात. पण पुरूषांना ते मान्य नसतात.