भारतातील एक असं गाव जेथील श्वान आहेत कोट्याधीश, लाखो रूपये आहे त्यांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 04:38 PM2023-03-24T16:38:46+5:302023-03-24T16:41:23+5:30
भारतातील गुजरातमध्ये असंच एक गाव आहे जेथील साधारण 70 श्वान कोट्याधीश आहेत. तुम्हाला ही गंमत वाटू शकते. पण ही गंमत नसून सत्य आहे.
आजच्या काळात पैस सगळ्यांसाठीच महत्वाचा झाला आहे. लोक चांगल्यात चांगल्या पगारासाठी एक नोकरी सोडून दुसरीकडे जातात. चांगली कमाई व्हावी म्हणून स्टार्टअप सुरू करतात. जर नशीबाने साथ दिली तर लोक कोट्याधीशच नाही तर अब्जाधीशही होतात. हे तर झालं मनुष्यांच्या कमाईबाबत. पण तुम्ही एखाद्या कोट्याधीश श्वानाबाबत ऐकलं का? नसेल ऐकलं तर आम्ही अशाच काही श्वानांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
भारतातील गुजरातमध्ये असंच एक गाव आहे जेथील साधारण 70 श्वान कोट्याधीश आहेत. तुम्हाला ही गंमत वाटू शकते. पण ही गंमत नसून सत्य आहे. गुजरातच्या मेहसाणाच्या पंचोट गावात राहणारे साधारण 70 श्वान कोट्याधीश आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, श्वानांकडे इतकी संपत्ती कशी? चला तर जाणून घेऊ...
मेहसाणाजवळचं एक छोटं गाव बायपासजवळ वसलं आहे. त्यामुळे येथील जमिनीचे भाग खूप वाढले आहेत. गावात एक ट्रस्ट आहे ज्याचं नाव मढ़ नी पती कुतरिया ट्रस्ट. हे ट्रस्ट श्वानांची देखरेख करतं. या ट्रस्टला काही वर्षाआधी मोठी जमीन दानात मिळाली होती. या जमिनीतून होणाऱ्या उत्पनातून श्वानांची काळजी घेतली जाते. तेच जमिनीची किंमत बायपासवर असल्याने कोट्यावधी रूपये झाली आहे. म्हणजे एका श्वानाच्या वाट्याला एक कोटी रूपये येतील.
ट्रस्ट या जमिनीच्या माध्यमातून पैसे कमावते. दरवर्षी काही जमिनीवर शेती केली जाते. त्यासाठी बोली लावली जाते. ज्याने जास्त बोली लावली त्यांना 1 वर्ष जमीन शेतीसाठी दिली जाते. यातून ट्रस्ट लाखो रूपयांची कमाई करतं. यातून श्वानांची देखरेख केली जाते.
ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांनी सांगितलं की, 70 वर्षाआधी ही जमीन दान मिळाली होती. त्यावेळी कुणाला माहीत नव्हतं की, याची किंमत इतकी वाढले. ही दान मिळाल्याने कुणी परत घेऊ शकत नाही. त्यामुळेच ही जमीन आजही ट्रस्टकडे आहे आणि श्वानांना कोट्याधीश बनवत आहे.