गावाने सोडला दारूचा व्यवसाय
By admin | Published: January 31, 2017 12:33 AM2017-01-31T00:33:41+5:302017-01-31T00:33:41+5:30
मिझोरामचे डारलांग हे गाव एकेकाळी ‘राकजू’ या तांदळापासून तयार होणाऱ्या गावठी दारूच्या बेकायदा उत्पादनासाठी कुख्यात होते. मात्र, केंद्राची ग्रामीण रोजगार योजना
मिझोरामचे डारलांग हे गाव एकेकाळी ‘राकजू’ या तांदळापासून तयार होणाऱ्या गावठी दारूच्या बेकायदा उत्पादनासाठी कुख्यात होते. मात्र, केंद्राची ग्रामीण रोजगार योजना ईशान्य भागात सुरू झाल्यानंतर या गावावरील ‘दारू बनवणारे गाव’ हा शिक्का पुसला गेला आहे. येथील लोक आता शेती आणि शेतीशी संबंधित कामकाज करू लागले. डारलांग राज्याची राजधानी एजलपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. ६८० लोकसंख्या असलेल्या या गावातील निम्म्याहून अधिक लोक राकजू तयार करण्याचे काम करीत. सिंचन सुविधांअभावी पीक उत्पादन म्हणावे तेवढे नव्हते. त्यामुळे राज्यात राकजूवर बंदी असूनही त्यांना उपजीविकेसाठी राकजू तयार करण्याशिवाय पर्याय नव्हता. गावातील लोकांनी २०१२ मध्ये दारूचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. मात्र उपजीविकेचे साधन हिरावले गेले होते.पर्यायी साधनांची गरज होती. तेव्हा जागतिक बँक प्रायोजित आणि ईशान्य विकास मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणारी ईशान्य ग्रामीण रोजगार योजना त्यांच्या मदतीला धावून आली. तिथे सामुदायिक विकास योजनेंतर्गत डारलांग येथे लघु सिंचन प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न वाढून शेतीसाठीच्या क्षेत्राचाही विस्तार झाला.