भारतातील एक असं गाव जे दोन देशाचा भाग आहे, प्रमुखाला आहेत 60 बायका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 01:27 PM2022-10-04T13:27:54+5:302022-10-04T13:30:45+5:30
Longwa Village in Nagaland : आज अशाच एका गावाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे गाव पूर्व भारतातील आहे. या गावाची खासियत म्हणजे हे गाव दोन देशात वाटलं गेलं आहे.
Longwa Village in Nagaland : भारतात देश आपल्या विविधतेसाठी ओळखला जातो. येथील संस्कृती आणि येथील साधं जीवन जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. भारताच्या चारही बाजूने असलेल्या राज्याच्या गावातील लोक आपल्या खास जीवनशैलीसाठी ओळखले जातात. यात काही गाव असेही आहेत जे खास आहेत. आज अशाच एका गावाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे गाव पूर्व भारतातील आहे. या गावाची खासियत म्हणजे हे गाव दोन देशात वाटलं गेलं आहे. गाव दोन देशांचा भाग आहे. येथील लोकांना दुहेरी नागरिकता मिळाली आहे.
लोंगवा गाव
या गावाबाबत सांगायचं तर या गावाचं नाव लोंगवा आहे. हे गाव नागालॅंडमध्ये आहे. हे गाव सामान्य गावासारखंच गाव आहे. पण एक खास बाब या गावाला वेगळं करते. ती बाब म्हणजे हे गाव दोन देशात विभागलं आहे. एक भाग भारतात तर दुसरा भाग म्यानमारमध्ये. गावातील लोकांना दुहेरी नागरिकता मिळाली आहे. ते सहजपणे भारतासोबतच म्यानमारमध्येही फिरू शकतात.
प्रमुखाच्या घरातून गेली आहे सीमा
Outlookindia नुसार, लोंगवा गावाच्या प्रमुखाच्या घरातून आंतरराष्ट्रीय सीमा गेली आहे. हे गाव राज्यातील मोन जिल्ह्यात येतं. जिथे प्रमुखच गावाचा परंपरागत शासक आहे. ज्याला ‘Angh’ म्हटलं जातं.
प्रमुखाला आहेत 60 पत्नी
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, प्रमुखाला 60 बायका आहेत. आणि म्यानमार आणि अरूणाचल प्रदेशातील साधारण 70 गावावर त्याचं राज्य चालतं.
कोन्याक जमातीचे लोक
Outlookindia नुसार, या गावात कोन्याक नागा जमातीचे लोक राहतात. ज्यांना देशातील शेवटची हेडहंटर जमात मानलं जातं. हे लोक कधीकाळी लोकांचे गळे कापून त्यांचं शीर आपल्या जवळ ठेवत होते. पण 1960 नंतर हे सगळं बंद झालं.
चेहरे-शरीरावर टॅटू
कोन्याक जमातीच्या लोकांच्या चेहरे आणि शरीरावर टॅटू दिसतात. ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. हे लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, व्यक्तीच्या कवटीमध्ये त्याच्या आत्म्याची शक्ती असते. जी समृद्धी आणि प्रजनन क्षमता जुळलेली असते. आजही हे लोक Brass Skull Necklaces घालून दिसतील. जे त्यांची संस्कृती आणि परंपरा दाखवण्याचं काम करतात.