३ तास लिफ्टमध्ये अडकला, शाळेतला सर्व अभ्यास संपवला, ८ वर्षाच्या मुलाचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 11:20 AM2023-08-23T11:20:42+5:302023-08-23T11:22:37+5:30

एका सोसायटीची लिफ्ट अचानक बंद पडली. या लिफ्टमध्ये ८ वर्षाचा मुलगा अडकला होता.

viral news A society's lift suddenly stopped An 8-year-old boy was trapped in this lift. | ३ तास लिफ्टमध्ये अडकला, शाळेतला सर्व अभ्यास संपवला, ८ वर्षाच्या मुलाचं होतंय कौतुक

३ तास लिफ्टमध्ये अडकला, शाळेतला सर्व अभ्यास संपवला, ८ वर्षाच्या मुलाचं होतंय कौतुक

googlenewsNext

लिफ्ट बंद पडण्याचे घटना अनेक समोर येत आहेत. काही ठिकाणी लिफ्ट बंद पडल्यामुळे मोठ्या दुर्घटना घडल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे लिफ्ट बंद पडली तर आपल्याला भिती वाटते, यामुळे आपण आरोडा-ओरडा करतो, मदतीची मागणी करतो. अशीच एक लिफ्ट बंद पडल्याची घटना समोर आली आहे. पण, या लिफ्टमध्ये आठ वर्षाचा मुलगा हा एकटाच होता. यावेळी त्या मुलगा जास्त आरडो-ओरडा आणि न घाबरता त्याने या संकटाला तोंड दिले आहे. महत्वाचं म्हणजे त्याने लिफ्टमध्ये तीन तास बसून आपला अभ्यास पूर्ण केला आहे, यामुळे आता या ८ वर्षाच्या मुलाचं कौतुक होतं आहे. 

नशीब असावं तर असं...! अचानक नोकरीवरून काढले पण २४ तासांत बनला कोट्यधीश

शनिवारी फरीदाबाद येथील ओमेक्स रेसीडेंसी सोसायटीमध्ये एक ८ वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला. हा मुलगा तासीकेसाठी निघाला होता. यावेळी लिफ्ट मध्येच बंद पडली. या मुलाचे नाव गौरवान्वित आहे, त्याने इतक्या लहान वयात मोठ्या धीराने इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला. या संपूर्ण घटनेबद्दल मुलाला विचारले असता त्याने ही घटना कशी घडली आणि लिफ्टमध्ये स्वतः कसा थांबला याची माहिती दिली. 

गौरव सायंकाळी पाच वाजता तासीकेसाठी लिफ्टमधून निघाला. यावेळी मध्येच लिफ्ट बंद पडली. तो नेहमी ६ वाजताच्या दरम्यान परत येतो पण आज सात वाजून गेले तरीही आला नाही म्हणून घरच्यांनी त्याची चौकशी सुरू केली. ट्युशनमध्ये फोन करुन चौकशी केली असता तो आज ट्युशनला आला नसल्याची माहिती मिळाली. यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी त्यांना सोसयटीचा लिफ्ट सायंकाळ ५ पासून बंद असल्याचे समजले. कुटुंबियांनी शोध घेतला पण त्यांना गौरवचा पत्ता लागला नाही. कुटुंबियांना तो लिफ्टमध्ये अडकल्याची भिती वाटली. 

कुटुंबियांनी आणि सोसायटीतील लोकांनी लगेच लिफ्ट व्यवस्थापकांशी संपर्क करुन लिफ्ट उघडली तेव्हा त्या लिफ्टमधून गौरव बाहेर आला. यावेळी गौरवने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मी लिफ्टमध्ये अडकलो तेव्हा मदतीसाठी आरडा-ओरड केली पण कोणीच आले नाही, मी इमरजन्सीचे बटणही दाबले पण कोणीच मदतीला आले नाही, त्यामुळे मी एकटाच बसून राहिलो. यावेळी मी ट्युशन आणि शाळेत दिलेला सर्व अभ्यास संपवल्याची माहिती गौरवने दिला. 

गौरवच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. आपण एखाद्या लिफ्टमध्ये अडकलो तर लगेच आरोडा-ओरड करतो, घाबरतो पण या आठ वर्षाच्या मुलाने त्याचा अभ्यास संपवला. या धाडसाचे सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होतं आहे. 

Web Title: viral news A society's lift suddenly stopped An 8-year-old boy was trapped in this lift.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.