नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 06:14 PM2021-04-06T18:14:12+5:302021-04-06T18:25:50+5:30
Viral News : सुधांशुकुमार यांनी आपल्या शेतीला वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्कच्या साहाय्यानं जोडलं आहे.
देशात शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीबाबत सर्वत्र चर्चा केली जात आहे. आज आम्ही तुम्हाला बिहारच्या अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. जो शेतकरी इतरांसाठी आदर्श ठरला आहे. समस्तीपूर जिल्ह्यापासून ४५ किलोमीटर लांब हसनपूर प्रखंडमध्ये सुधांशु कुमार हे आपल्या ७० बीघा जमिनीवर अधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. दरवर्षी या शेतीतून ८० लाखांची कमाई त्यांच्याकडून केली जाते.
सुधांशु कुमार मायक्रो स्प्रिंकलरच्या मदतीनं आपल्या शेताला पाणी पुरवतात. त्यामुळे लिचीच्या बागेत तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. सुधांशुकुमार यांनी आपल्या शेतीला वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्कच्या साहाय्यानं जोडलं आहे. याशिवाय शेतात सीसीटिव्ही कॅमेराजही लावले आहेत. ७० बीघा शेतात सुधांशू यांनी २७०० झाडं लावली आहेत. यात केळी, पेरू, लिंबू, मोसंमी, लीची आणि आंब्यांचा समावेश केला आहे.
याशिवाय जांभूळ आणि चिंचसुद्धा त्यांच्या शेतात पिकवलं जातं. या सगळया पिकांतून वर्षाला ८० लाख रूपयांची कमाई होते. लीचीच्या उपत्नादनातून वर्षाला २२ लाख रूपयांची कमाई होते. तर आंब्याच्या पिकातून १३ लाख रूपये मिळतात. छठपुजेच्या आधी ३५ लाख रूपयांच्या केळ्यांची विक्री झालीअसल्याचं ते सांगतात. एकूण काय तर फळांच्या शेतीतून टर्नओव्हर जास्त होतो.
तब्बल २६०० वर्षांआधी कुऱ्हाडीनं केली होती ममीची हत्या; समोर आला मोठा खुलासा
सुशांधू कुमार हे फक्त कडकनाथ कोंबडीचं पालन करत नाहीत तर डेअरी उत्पादनांचीही निर्मीती करतात. त्यांनी आपल्या शेतात ५०० कोंबड्याचे एक पोल्ट्री फार्म उघडलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रजातीच्या गायीसुद्धा आहेत. २०१४ मध्ये महिंद्रा समृद्धी इंडीया एग्री अवॉर्डसच्या माध्यमातून त्यांना गौरवण्यात आलं होतं.
कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....
सुशांधू कुमार यांनी सुरूवातीला केरळमधील टाटा टी गार्डनमध्ये नोकरी केली. त्यानंतर नोकरी सोडून कायमचे गावी निघून गेले. आपल्या मुलानं सिविल सर्विजेसमध्ये आयएएस बनावं असं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. सुधांशु यांच्या वडीलांनी ५ एकर जमीन त्यांना शेती करायला दिली होती. १९९० मध्ये त्यांनी शेती करायला सुरूवात केली. आता फक्त बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात सुशांशू यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे.