Viral News: एक जिद्द आणि बनला अब्जाधीश; ३० वर्षे खरेदी करत होता एकाच नंबरचं Lottery Ticket
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 02:02 PM2021-08-28T14:02:46+5:302021-08-28T14:05:56+5:30
१९९१ पासून ती व्यक्ती खरेदी करत होती लॉटरीचं तिकिट.
लॉटरीचे तिकीट (Lottery Ticket) कोणत्याही जुगारापेक्षा कमी नाही. नशीब चांगले असेल तर तुम्ही जिंकू शकता, अन्यथा लोक वर्षानुवर्षे आशेने खेळत राहतात. अलीकडे, अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने लॉटरीमध्ये जॅकपॉट (Jackpot) जिंकला आहे. आपण असा विचार करत असाल की ही एक सामान्य गोष्ट आहे, दररोज इतकी लॉटरीची तिकिटे उघडली जातात, कोणी ना कोणी जिंकेल. वास्तविक, ही व्यक्ती १९९१ पासून त्याच सेटची तिकिटे खरेदी करत होती. ही बातमी आता जगभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (Viral News).
काही लोक त्यांच्या ठरवलेल्या गोष्टींवर ठाम असतात. जिद्दीनं ते असंच काहीतरी करत राहतात, ज्यात त्यांना कधी ना कधी तरी यशस्वी होण्याची पूर्ण आशा असते. या व्यक्तीच्याबाबतीतही अगदी असंच घडलं. लॉटरी मध्ये तुम्ही कधी जिंकाल याबद्दल कोणालाही खात्री असू शकत नाही. परंतु या व्यक्तीच्या विश्वासाचं कौतुक करावं लागेल. अमेरिकेतील मिशिगन येथे राहणारी ही व्यक्ती १९९१ पासून म्हणजेच गेल्या ३० वर्षांपासून लॉटरीच्या तिकिटांचा सेम सेट खरेदी करत होती.
विश्वासचं बसला नाही.
या ६१ वर्षीय व्यक्तीचं नाव उघड करण्यात आलेले नाही. लॉटरी जिंकल्यानंतर त्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांना सांगितलं की मी १९९१ पासून त्याच सेटसाठी तिकिटं खरेदी करत होतो. पण आजपर्यंत जिंकता आलं नाही. मी अनेक वेळा नंबर बदलण्याचा विचार केला पण नंतर जिद्दीनं या सेटवर राहिलो. मी आज १८.४१ दशलक्ष डॉलर्सची लॉटरी जिंकल्यावर मला विश्वास बसला नाही. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे १,३६४८,७७,८१८ रूपये इतकी आहे.
त्या व्यक्तीनं ११.७ मिलियन डॉलर्स कॅशमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. या रकमेचा काही भाग तो आपल्या कुटुंबाला देणार आहे, काही रकक्कम दान करणार आहे आणि काही रक्कम सेव्ह करणार असल्याचंही त्यानं सांगितलं.