NRI Chaiwala : मानलं गड्या! परदेशातली नोकरी सोडून भारतात आले अन् चहाचं दुकानं टाकलं; आता होतोय १.२ कोटींचा टर्नओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 04:55 PM2021-03-31T16:55:34+5:302021-03-31T17:31:02+5:30
NRI Chaiwala Trending Viral News in Marathi : ही कहाणी एनआरआय जगदीश कुमार यांची आहे. हे न्युजीलँडमध्ये आरामदायक आयुष्य जगत होते. त्यांनी अनेक वर्ष हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम केलं.
एकवेळ अशी होती जेव्हा घरातले म्हणायचे जर अभ्यास केला नाही तर चहाची टपरी टाकावी लागेल. पण आता असं काहीही राहिलेलं नाही. कोणताच धंदा हा लहान किंवा मोठा नसतो. आतापर्यंत तुम्ही चहा विकून लाखो रूपये कमावत असलेल्या अनेक तरूणांबद्दल ऐकलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाबद्दल सांगणार आहोत. जी व्यक्ती न्यूजीलँडमधील आरामदायक आयुष्य सोडून चहाचा व्यवसाय करण्यासाठी भारतात आली आहे.
ही कहाणी एनआरआय जगदीश कुमार यांची आहे. हे न्युजीलँडमध्ये आरामदायक आयुष्य जगत होते. त्यांनी अनेक वर्ष हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम केलं. पण २०१८ मध्ये त्यांनी एक प्लॅन तयार केला आणि नेहमीसाठी भारतात येऊन चहा विकायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजच्या तारखेला त्यांच्या कंपनीत ३५ कर्मचारी असून त्यांच्या कंपनीचा टर्नोव्हर १.२ कोटींचा आहे.
सुरुवातीला एचसीएल आणि एनफोसिस सारख्या MNCs कंपनीज जगदीश यांच्या कमाईचं मुख्य साधन होत्या. या कंपनींमध्ये ते चहा पुरवत होते. त्यानंतर ४ मल्टी ब्रांड आऊटलेट्समध्येही त्यांनी चहाचा पुरवठा केला आहे. सध्या ते वेडींग कॅटरिंगचा बिझनेस करण्याचा विचार करत आहेत. जगदिश हे आसामहून वेगवेगळ्या प्रकारची चहा पावडर मागवतात. त्यानंतर वेगवगेळ्या प्रकारे कॉम्बिनेशन्स तयार केले जातात. उदा, एंटी कोरोना ब्रम्हास्त्र चहा, आईच्या हातचा आल्याचा चहा, प्रेमाचा चहा अशा वेगवेगळ्या प्रकारे चहा विकली जाते. तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत
बाजारात दिवसेंदिवस दिवस स्पर्धा वाढत आहे. म्हणून त्यांनी सुरूवातीपासून आतापर्यंत चहाची किंमत फक्त १० रूपये ठेवली आहे. जगदीश आत्मनिर्भर बिझनेस आणि देशातील स्टार्टअप कल्चरने प्ररित झाले आहेत. त्यांच्यामते लोकांनी घरी बसण्यापेक्षा डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप कल्पचरचा आनंद घेऊन बिझनेस उभा करायला हवा. टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....