Viral News: ऑनलाइन साइटवरुन खरेदी केली सेकंड हँड अलमारी, आत निघाले कोट्यवधी रुपये; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 03:15 PM2022-04-28T15:15:23+5:302022-04-28T15:15:54+5:30
Viral News: eBay या ऑनलाइन साइटवरुन अवघ्या 19 हजारांमध्ये खरेदी केलेल्या अलमारीत कोट्यवधी रुपये मिळाले.
Viral News: जुने घर किंवा अलमारींमध्ये मौल्यवान वस्तू भेटल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना जर्मनीच्या व्यक्तीसोबत घडली. त्याने eBay या ऑनलाइन साइटवरुन एक सेकड हँड अलमारी खरेदी केली. घरी आल्यानंतर त्याने ती अलमारी उघडली आणि आतील दृष्य पाहून त्याला धक्का बसला.
कोट्यवधी रुपयांची रोकड
मिळालेल्या माहितीनुसार, थॉमस हेलर असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा बिटरफिल्ड, जर्मनीचा आहे. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, किचनमध्ये सामान ठेवण्यासाठी थॉमसने सेकंड हँड कपाट खरेदी केले होते. eBay वरुन त्याने 19 हजार रुपयांमध्ये एक अलमारी खरेदी केली. पण, त्यात त्याला एक कोटींहून अधिकची रोकड मिळाली.
Man finds £130,000 CASH in kitchen cabinets he bought on eBay https://t.co/d238Ywo4qR
— Daily Mail Online (@MailOnline) April 27, 2022
मूळ मालकाला केले परत
अलमारी उघडल्यानंतर त्यात दोन बॉक्स मिळाले, त्या बॉक्समध्ये 1 कोटी 19 लाख रुपयांची रोकड होती. एखाद्या व्यकीते ती रोकड स्वतःकडे ठेवली असती, पण थॉमसने प्रामाणिकपणा दाखवत ते पैसे अलमारीच्या मूळ मालकापर्यंत पोहोचावेत म्हणून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.
तपासानंतर सत्य समोर आले
पोलिसांनी तपास केला आणि हे पैसे हॅले सिटीमध्ये राहणाऱ्या 91 वर्षीय वृद्ध महिलेचे असल्याचे समजले. अलमारीची पहिली मालकीनही तीच होती. महिलेच्या नातवाने तिच्या परस्पर अलमारी विकली, पण त्यात पैसे असल्याची त्याला माहिती नव्हती. विशेष म्हणजे, जर्मनीमध्ये हरवलेले पैसे (हजार रुपयांपेक्षा जास्त) आपल्याजवळ ठेवणे गुन्हा आहे. दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. मात्र, प्रामाणिकपणे पैसे परत करणाऱ्यांना बक्षीसही दिले जाते, असाही कायदा आहे. अशा परिस्थितीत एकूण रकमेपैकी ३% रक्कम थॉमसला बक्षीस म्हणून देण्यात आली. थॉमसला साडेतीन लाखांहून अधिक रुपये मिळाले.