एकच साप सहा वेळा चावला, पिच्छा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 12:49 PM2024-07-08T12:49:04+5:302024-07-08T12:56:59+5:30

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका तरुणाला एकाच सापाने सहा वेळा चावा घेतला.

viral news uttar pradesh snake attack case vikas dubey bitten for six Time | एकच साप सहा वेळा चावला, पिच्छा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...

एकच साप सहा वेळा चावला, पिच्छा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...

साप हे बदला घेणारे असतात असं बोललं जात, पण विज्ञानानुसार साप हे बदला घेणारे नसतात.  उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला सापाने चक्क सहा वेळा चावा घेतला. यानंतर तरुणाने स्वत:ला वाचवण्यासाठी आपल्या नातंवाईकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण, या सापाने त्याची पाठ सोडली नाही. नातेवाईकांच्या घरी जाऊनही सापाने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे, ही घटना उत्तर प्रदेशातील  फतेहपूर येथील आहे. 

ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एका तरुणाला सहाव्यांदा साप चावला. दीड महिन्यात त्याला सहाव्यांदा साप चावला. सुदैवाने तो तरुण वाचला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सापापासून वाचण्यासाठी हा तरुण आधी मावशीच्या घरी, नंतर मामाकडे गेला, पण सापाने त्याला सोडले नाही. या घटनेने तरुणाच्या कुटुंबासह परिसरातील नागरिक हादरले आहेत. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले आहेत. विकास दुबे (२४) या तरुणाला दीड महिन्यात एक-दोनदा नव्हे तर सहा वेळा साप चावला. प्रत्येक वेळी उपचारानंतर विकास बरा झाला. त्याच्यावर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सापापासून वाचण्यासाठी विकास घरातून बाहेर पडला. आधी तो आपल्या मावशीच्या घरी गेला पण तिथेही त्याला साप चावला. त्यानंतर तो मामाच्या घरी पोहोचला तेव्हा सापाने त्याला पुन्हा चावा घेतला. 

पीडित विकास दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला दीड महिन्यात ६ वेळा साप चावला. रुग्णालयात केलेल्या उपचारानंतर तो वाचला. साप चावण्यापूर्वीच साप आपल्यावर हल्ला करणार आहे हे त्याच्या लक्षात येते.

विकास दुबे यांनी सांगितले की, २ जून रोजी रात्री ९ वाजता अंथरुणावरुन उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला जवळच्या खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले. उपचार करून घरी परतल्यावर ८ दिवसांनी म्हणजेच १० जूनच्या रात्री त्याला दुसऱ्यांदा साप चावला. उपचार झाले आणि तो पुन्हा बरा होऊन घरी परतला. दोन वेळा झालेल्या या घटनेमुळे विकास थोडा घाबरला होता. पण हे प्रकरण इथेच थांबले नाही. स्वत:ला वाचवण्यासाठी विकास त्याच्या मावशीच्या घरी गेला तेव्हा त्याला दोनदा साप चावला. दरवेळेप्रमाणेच यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला. या घटनेने विकासचे नातेवाईक आणि डॉक्टरही अचंबित झाले. सर्वांनी त्याला साप चावू नये म्हणून काही दिवस घरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

मावशीच्या घरीही सापाने घेतला चावा

घाबरलेल्या विकासने घरच्यांचा सल्ला ऐकला. यानंतर तो मावशीच्या घरी गेला. पण मावशीच्या घरीही सापाने त्याला सोडले नाही. २८ जून रोजी विकासला त्याच्या मावशीच्या घरी पाचव्यांदा साप चावला. त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. यातुनही तो बरा होऊन घरी आला. यानंतर तो मामाच्या घरी राहायला गेला. पण इथेही सापाने त्याला सोडले नाही. गेल्या रविवारी विकासला सापाने सहाव्यांदा चावा घेतला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने कुटुंबीय हादरले आहेत.

Web Title: viral news uttar pradesh snake attack case vikas dubey bitten for six Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.