Viral News: कारागृहातील कैदी काळ्या आणि पांढर्या पट्ट्यांचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 05:26 PM2022-02-17T17:26:07+5:302022-02-17T17:26:21+5:30
तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना काळा आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेल्या कपड्यात पाहिले असेल. जाणून घ्या या गणवेशामागचा इतिहास.
तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये तुरुंगातील सीन पाहिला असेल. तुरुंगातील कैदी पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्या असलेले कपडे घालतात. पण, कैदी अशा रंगाचे कपडे का घालतात, याचा कधी विचार केला आहे का? कारागृहातील कैद्यांना गणवेश देण्याची कथा इतिहासाशी निगडित आहे. ऑबर्न प्रिझन सिस्टीम 18व्या शतकात अमेरिकेत उदयास आल्याचे सांगण्यात येते.
कैद्याने गणवेश परिधान करण्यामागे हे कारण आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वात मोठे कारण म्हणजे जर एखादा कैदी ड्रेस फिक्स केल्यानंतर पळून गेला तर लोक त्याला ओळखतील आणि पोलिसांना सांगतील. याशिवाय त्यांच्यात शिस्तीची भावना भरावी म्हणून ड्रेस दिला जातो. सुरुवातीला राखाडी-काळ्या पट्ट्यांचा गणवेश होता, पण राखाडी कलरला 'लज्जेचे प्रतीक' म्हटले जाऊ लागले. यानंतर त्यांचा ड्रेस बदलून काळा-पांढऱ्या पट्ट्या असलेला ड्रेस ठरवण्यात आला.
इतर देशात वेगळे कपडे आहेत
जगभरात कैद्यांना भारताप्रमाणे पांढरा-काळा पट्टे असलेला गणवेश दिला जातो, असे नाही. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले तर इंग्रजांच्या काळात कैद्यांच्या मानवी हक्कांचा विचार केला जात असे. अशा परिस्थितीत हा ड्रेस तिथूनच अस्तित्वात आला. पण सर्व कैद्यांना ड्रेस दिला जात नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यांनाच ड्रेस दिला जातो. याशिवाय ज्यांना कोठडीत ठेवण्यात आले आहे, ते सामान्य कपड्यांमध्येच राहतात.