कॉकरेजमुळे बसला मोठा झटका! महिलेला लाखोंची नोकरी अन् राहत घर सोडावं लागलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:38 PM2023-07-20T16:38:06+5:302023-07-20T16:39:35+5:30
कॉकरेज प्रत्येकाच्या किचनमध्ये असतेच, काहीजण कॉकरेजला जास्तच घाबरतात.
कॉकरेज प्रत्येकाच्या किचनमध्ये असतेच, काहीजण कॉकरेजला जास्तच घाबरतात. एका कॉकरेजमुळे एका तरुणीला नोकरी आणि घरं सोडावं लागलंय. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. हे प्रकरण दक्षिण चीनचे आहे. तिथे असणाऱ्या झुरळांमुळे महिलेने नोकरी सोडली. आता या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
शिओमिन आडनाव असलेली ही तरुणी उत्तर चीनमधील मंगोलियाची आहे. ही तरुणी तीन वर्षांपासून ग्वांगझूमध्ये काम करत होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील तिच्या प्रोफाइलनुसार, ती व्हिडीओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनिंगमध्ये माहिर आहे.
शिक्षिकनेच घातला गणवेश, शाळेत लावली हजेरी; यामागे आहे खास कारण, जाणून घ्या...
एका व्हिडिओमध्ये, महिलेने खुलासा केला आहे की, तीन वर्षांपूर्वी दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांताच्या राजधानीत येईपर्यंत तिने कधीही झुरळ पाहिले नव्हते. महिलेने सांगितले की झुरळे प्रचंड आहेत. तेही उडू शकतात.
१४ जुलै रोजी जियाहोंगशुवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये महिलेने कीटकांचे फोटोही शेअर केले होते. त्या महिलेने सांगितले की, ती कीटकांमुळे किती निराश झाली होती. खोली साफ करूनही काहीही झाले नसल्याचे महिलेने सांगितले. भेगा सील करूनही काहीही झाले नाही. मी जे काही केले, त्याचा कोणालाच फायदा झाला नाही.
महिलेने सांगितले की, आता फक्त कॉकरोज हा शब्द टाईप करूनही मी घाबरते. मला इमोजी बघूनही भीती वाटते. महिलेला झुरळाचा फोबिया झाला आहे. मला खूप असहाय्य वाटत होते. मी पण ढसाढसा रडले. मी कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो पण ही भीती कधीच कमी होऊ शकत नाही.
महिला खचून गेल्यावर तिला नोकरीचा राजीनामा देण्याचा विचार करावा लागला. झुरळांनी महिलेचा छळ केला. 'मला आता फक्त विमानाची तिकिटे काढायची आहेत आणि बाहेर जायचे आहे, असंही महिला म्हणाली. महिलेचे प्रकरण आता व्हायरल झाले आहे.