बाबो! 'या' मुलीने डोळ्यातही काढला टॅटू, शरीरावरील एकूण टॅटूचा आकडा वाचून व्हाल थक्क....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 11:01 AM2021-01-06T11:01:36+5:302021-01-06T11:12:27+5:30
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समध्ये राहणारी एंबर ल्यूक २५ वर्षांची आहे. तिला टॅटूवर टॅकू काढण्याचा शौक आहे. एंबरने तिच्या शरीरावर २०० पेक्षा जास्त टॅटू काढले आहेत. एंबरला ड्रॅगन गर्लही म्हटलं जातं.
प्रत्येक व्यक्तीला कशाची ना कशाचीतरी क्रेझ असते. कुणाला वाचणे-शिकण्याची क्रेझ असते तर कुणाला खेळण्याची. काही लोक आपलं लक्ष्य मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा तरूणीबाबत सांगणार आहोत जी संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेण्यासाठी क्रेझी आहे. या तरूणीने तिच्या शरीराच्या ९८ टक्के भागावर टॅटू काढले आहेत. पण या तरूणीची हे क्रेझ तिचा जीवही घेऊ शकते.
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समध्ये राहणारी एंबर ल्यूक २५ वर्षांची आहे. तिला टॅटूवर टॅकू काढण्याचा शौक आहे. एंबरने तिच्या शरीरावर २०० पेक्षा जास्त टॅटू काढले आहेत. एंबरला ड्रॅगन गर्लही म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी एंबरला तिची ही टॅटू काढण्याची क्रेझ महागात पडली होती. एंबरने तिच्या डोळ्यात निळ्या रंगाचा टॅटू बनवला होता. ज्यामुळे ती तीन आठवड्यांसाठी आंधळी झाली होती.
एंबरने आतापर्यंत टॅटू काढून घेण्यासाठी जवळपास १९ लाख रूपये खर्च केले आहेत. एंबरने सांगितले की, डोळ्यात टॅटू काढणे फार खरतनाक अनुभव होता. तिला तीन आठवडे दिसणं बंद झालं होतं. डोळ्यात टॅटू बनवण्यासाठ ४० मिनिटांचा वेळ लागला होता. हा टॅटू काढताना जराही चूक झाली असती तर तिने आयुष्यभरासाठी डोळे गमावले असते.
एंबरने आतापर्यंत अनेक सर्जरी केल्या आहेत. एंबरने सर्जरी करून आतापर्यंत स्तन, ओठ आणि आयब्रोमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. पण आता ती शरीरात काहीही बदल करणार नाहीये. एंबरला शरीरावर टॅटू काढून घेण्याचा शौक १६ व्या वर्षांपासून होता. एंबरने कधीही याची चिंता केली नाही की, म्हातारी झाल्यावर ती या टॅटूजमुळे कशी दिसेल. एंबरला तिच्या या टॅटूंसोबतच दफन व्हायचं आहे.