Video - लय भारी! 20 उठाबशा काढा अन् बसचं तिकीट मोफत मिळवा; कारण ऐकून म्हणाल अरे व्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 11:36 AM2022-12-18T11:36:24+5:302022-12-18T11:47:06+5:30
20 स्क्वॉट्स म्हणजे उठाबशा काढल्यानंतर मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे.
वाढती लोकसंख्या, प्रदूषण आणि हवामानातील बदल रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे लोक खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्याने गर्दी कमी होते आणि वाहनांची संख्या कमी झाल्याने प्रदूषणही कमी होते. पण लोक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय क्वचितच वापरतात कारण तो थेट घरून उपलब्ध नसल्यामुळे लोकांना ठराविक ठिकाणी जावे लागते. पण जेव्हा सार्वजनिक वाहतूक मोफत मिळते, तेव्हा लोक काहीही करायला तयार होतात, असंच काहीस एका देशात झालं आहे.
20 स्क्वॉट्स म्हणजे उठाबशा काढल्यानंतर मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. इन्स्टाग्राम युजर @alinabzholkina ने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो लोकांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका मशीनसमोर बसून तिकीट काढत आहे. तुम्हाला वाटेल हे काय विचित्र कृत्य आहे. वास्तविक, हा व्हिडिओ रोमानियाचा आहे. जिथे एक नवीन नियम तयार करण्यात आला आहे.
या देशात असा नियम आहे की जो कोणी 20 वेळा उठाबशा काढेल त्याला बसने प्रवास करण्यासाठी मोफत तिकीट मिळेल. पैशांशिवाय प्रवास करायला कोणाला आवडणार नाही, यामुळे येथील लोकही या नियमाचा फायदा घेत सेन्सॉर केलेल्या तिकीट वेंडिंग मशीनसमोर बसून मोफत तिकिट मिळवत आहेत. यामुळे लोकांना सार्वजनिक वाहतूक अधिकाधिक वापरण्यास प्रवृत्त केले जात आहे आणि दुसरे म्हणजे, लोकांचे आरोग्य देखील सुधारले जात आहे.
8 ऑक्टोबर रोजी पोस्ट केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याला 25 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या कल्पनेचे कौतुक केले, तर जे व्हिलचेअरवर आहेत किंवा अपंग आहेत, त्यांनीही यावर काही उपाय शोधण्याचा सल्ला दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"