याला म्हणतात नशीब! घरावर कोसळला दगड अन् काही मिनिटांत करोडपती झाला ना राव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 14:52 IST2020-11-19T14:48:15+5:302020-11-19T14:52:13+5:30
Viral News in Marathi : त्याच्या घरावर आकाशातून जणू खजिनाच कोसळला. त्यामुळे जोसुआ तब्बल १० कोटींचा मालक झाला आहे.

याला म्हणतात नशीब! घरावर कोसळला दगड अन् काही मिनिटांत करोडपती झाला ना राव...
उपरवाला देता है तो छप्पर फाड के! असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. खऱ्या आयुष्यात सुद्धा असं घडतं. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण इंडोनेशियातील ३३ वर्षांचा माणूस काही मिनिटांतच करोडपती झाला आहे. जोसुआ हुतागलुंग असं या माणसाचं नाव आहे. त्याच्या घरावर आकाशातून जणू खजिनाच कोसळला. त्यामुळे जोसुआ तब्बल १० कोटींचा मालक झाला आहे.
डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार जोसुआ उत्तर सुमात्रातील कोलांगमध्ये असलेल्या आपल्या घराच्या आजूबाजूला काम करत होता. त्यावेळी त्याच्या घरावर काहीतरी कोसळल्याने मोठा आवाज आला. यामुळे फक्त त्याचं घरच नाही तर आजूबाजूची घरंही हादरली. कारण खूप मोठा आवाज त्यावेळी झाला होता.
ज्यावेळी जोसुआनं नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या छताकडे पाहिलं तेव्हा त्याच्या छताला मोठ होल पडला होता. एक मोठा दगड त्याच्या घरावर कोसळला आणि यामुळे जमिनीवर १५ सेंटीमीटर खड्डा झाला. जोसुआनं दिलेल्या माहितीनुसार जेव्हा त्यानं जमिनीतून हा दगड बाहेर काढला तेव्हा तो खूप गरम होता आणि थोडा तुटलाही होता.
या दगडाचं वजन २.१ किलो होतं. नंतर लक्षात आले की, हा दगड साधासुधा नाही तर आकाशातून कोसळलेली एक दुर्मिळ उल्कापिंड आहे. ही उल्कापिंड खूप जुनी असल्याचं सांगितलं जातं आहे. आकाशातून हा दगड छतावर पडला असावा.
विशेष म्हणजे ही उल्कापिंड खूप मौल्यवान आणि दुर्मिळ आहे. याची किमंत जवळपास ८५७ डॉलर असावी. रिपोर्टनुसार जोसुआनं खड्डा खणून ही अनमोल उल्कापिंड बाहेर काढला, ज्यामुळे तिच्यावर त्याचा मालकी हक्क होता. या अनमोल दगडाच्या बदल्यात जोसुआला १४ लाख पाउंड म्हणजे तब्बल १० कोटी रुपये मिळाले. भारीच! आता मास्कमुळे चष्म्यावर येणार नाही फॉग; व्हायरल झाली डॉक्टरांची भन्नाट ट्रिक
जोशुआने माध्यमांशी बोलताना सांगितले की, '' अनेक वर्षे काम करून मला पगार मिळाला नाही, तितका पैसा आपल्याला या दगडामुळे मिळाला. मला तीन मुलं आहे. या पैशातून मी आपल्या समाजासाठी घरं बांधण्याचा विचार करत आहे.'' ऊसाच्या शेतात शिरलं हत्तीचं पिल्लू; अन् कोणीतरी आल्याचे कळताच खांबाआड लपलं, पाहा फोटो