Weight Loss Trick: आईसक्रीम, सकस अन्न खाऊन महिलेनं कमी केलं वजन, आधी होतं १०० किलो अन् आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 11:52 AM2022-06-04T11:52:46+5:302022-06-04T11:53:31+5:30
वाढलेलं वजन कमी करताना काय अवस्था होते ते साऱ्यांनाच माहिती आहे
Trending Weight Loss Trick: कोरोनामुळे सुरू झालेलं वर्क फ्रॉम होम आणि घरबसल्या ऑर्डर करून मागवलेलं जेवण यामुळे गेल्या दोन वर्षांत अनेकांना लठ्ठपणाला सामोरं जावं लागतंय. पण काही जाणकारांच्या मते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची किंवा कमी खाण्याची अजिबात गरज नाही. चांगला आणि निरोगी आहार (Healthy Diet) घेतल्याने तुम्ही तुमच्यातील लठ्ठपणावर नक्कीच मात करू शकता. एकेकाळी १०० किलो वजन असलेल्या दीपा सोनी यांनीही असंच आपलं वजन कमी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काय आहे कहाणी...
दीपा सोनी यांचे वजन १०० किलोच्या आसपास पोहोचले होते. पण त्यांच्या डाएट प्लॅनमुळे त्यांनी वजन ४० किलोपर्यंत कमी केले. अतिरिक्त वजनामुळे त्याची कंबर आणि गुडघेही वाढली होती. या समस्यांमुळे त्यांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. दीपा यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवसातून ४ वेळा खायच्या. त्यांचा नाश्ता दूध आणि अंडी यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा होता. दुपारच्या जेवणात त्या ५ ग्रॅम तुपासह मसूर आणि हिरव्या भाज्या खात असत. स्नॅक्समध्ये पार्लेजी बिस्किटे खायच्या आणि रात्रीच्या वेळी जेवणातील तूपासह थोडं चीजदेखील सेवन करत असत. पण मुख्य बाब म्हणजे, याशिवाय कधी कधी त्या आईस्क्रीम आणि मिठाईदेखील खायच्या. तरीही त्यांनी लठ्ठपणावर मात केली.
लठ्ठपणा आणि गुडघेदुखीवर मात करण्यासाठी खाण्यासोबतच चांगला व्यायाम केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत झाली. दीपा यांच्या म्हणण्यानुसार, त्या घरातील सर्व कामे स्वत: करत होत्या. याशिवाय नियमित वर्कआउट करत होत्या. शास्त्रशुद्ध पद्धतीने आधी वॉर्मअपपासून आणि हळूहळू वेग वाढवत जड वजन उचलण्यापर्यंत सर्व प्रकारच्या व्यायामाकडे त्यांनी लक्ष दिलं. अशाप्रकारे कठोर परिश्रम करून त्याने आपले वजन कमी केले, असं त्यांनी सांगितलं.