VIDEO : कशी बनवली जाते सोन्याची चेन? पूर्ण प्रॉसेस बघून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:17 PM2023-12-11T13:17:18+5:302023-12-11T13:17:40+5:30
आधी सोन्याचे दागिने केवळ जड राहत होते. जेवढं जास्त वजन तेवढी किंमत. पण हलक्या सोन्याचे डिझाइन्सही येत आहेत.
Viral Video : आजच्या काळात ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो, तेव्हा ते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता तर अनेक स्कीम्स आणि एसआयपी आल्याने सोन्यातील इन्व्हेस्टमेंट कमी झाली आहे. पण आजही जुने लोक सोनं घेणंच पसंत करतात. लग्नातही मुलीला तिच्या भविष्याच्या सेफ्टीसाठी सोनंच गिफ्ट दिलं जातं. आधी सोन्याचे दागिने केवळ जड राहत होते. जेवढं जास्त वजन तेवढी किंमत. पण हलक्या सोन्याचे डिझाइन्सही येत आहेत.
काळानुसार, सोन्याचे आजकाल बरेच फॅशनेबल लूक्स आले आहेत. बाजारात आज भरपूर डिझाइन बघायला मिळतात. पण तुम्ही हे दागिने बनवताना कधी पाहिलेत का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात चोवीस कॅरेट सोन्याला वितळवून त्याची चेन बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.
ही चेन किंवा साखळी तयार करण्यासाठी आधी सोन्याचं बिस्कीट वितळवलं जातं. सोन्याचं पाणी बनवलं जातं. त्यानंतर ते एका मोल्डमध्ये टाकलं जातं. ज्यामुळे त्याला एक लांब शेप मिळतो. गरम सोन्यालाच छोट्या कड्यांचा शेप दिला जातो. त्यानंतर फिक्स केल्या जातात.
या व्हिडिओत सोन्याची चेन बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. जी बघून सगळेच हैराण झालेत. चेन जोडल्यानंतर तिला ट्विस्ट करणं, त्यांना चमकदार करणं आणि इतरही बरीच कामे असतात. इतक्या मेहनतीनंतर हा पीस बाजारात विकला जातो. हे फारच मेहनतीचं आणि अवघड काम आहे हे यातून दिसून येतं.