Viral Video: मंदिरातील व्यक्तीसोबत चक्क बोलताना दिसली हत्तीण, बघून तुमचाही बसणार नाही विश्वास.....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 09:59 AM2021-01-02T09:59:47+5:302021-01-02T10:02:08+5:30
हा व्हिडीओ सनातन धर्माचं सर्वात मोठं मंदिर श्रीरंगम मंदिर परिसरातील आहे. श्रीरंगमला तमिळमध्ये तिरूवरंगम असंही म्हटलं जातं.
तुम्ही हत्तींचे वेगवेगळे व्हिडीओ पाहिले असतील, पण तुम्ही कधी हत्तीला इशाऱ्यांमध्ये बोलताना पाहिलं का? बहुतेक लोक नाही असं म्हणतील. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीण तिच्या सेवकासोबत इशाऱ्यात बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
हा व्हिडीओ सनातन धर्माचं सर्वात मोठं मंदिर श्रीरंगम मंदिर परिसरातील आहे. श्रीरंगमला तमिळमध्ये तिरूवरंगम असंही म्हटलं जातं. हे मंदिर तामिळनाडूच्या तिरूचिरापल्लीमध्ये आहे. या मंदिरात भगवान ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, इथे येऊन जे भाविक मनापासून पूजा करतात त्यांची इच्छा पूर्ण होते.
Watch this sweet communication between the Srirangam Temple elephant Andal and her Mahout.
— Sudha Ramen 🇮🇳 (@SudhaRamenIFS) December 27, 2020
Elephant's relation with the Mahout & cavady has mostly been so deep &intense. Its an eternal love. Only those who have seen that true love can understand.
Video via @Gannuuprempic.twitter.com/Vfkwbf1gY8
या मंदिरात एक हत्तीण आहे. तिच्या सेवेसाठी एक व्यक्ती ठेवण्यात आली आहे. तो सेवक हत्तीणीची खूप सेवा करतो. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोघेही एके ठिकाणी बसून गप्पा करताना दिसत आहेत. हत्तीण इशाऱ्या त्या व्यक्तीसोबत बोलत आहे.
ती व्यक्ती हत्तीणीला काही गोष्टी विचारतो त्यावर हत्तीण कधी बोलून तर कधी इशाऱ्यात उत्तर देतो. हा अनोखा व्हिडीओ लोक भरभरून शेअर करत आहेत. हा व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी Sudha Ramen यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३९०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.