काय सांगता? ४ वर्षांच्या चिमुरड्याला आईचा फोन सापडला; अन् त्यानं मागवलं साडे पाच हजाराचं जेवण

By manali.bagul | Published: November 26, 2020 07:12 PM2020-11-26T19:12:28+5:302020-11-26T19:15:54+5:30

Trending News in Marathi :

Viral Video : Four year old kid uses mom phone to order fast food worth 5500 | काय सांगता? ४ वर्षांच्या चिमुरड्याला आईचा फोन सापडला; अन् त्यानं मागवलं साडे पाच हजाराचं जेवण

काय सांगता? ४ वर्षांच्या चिमुरड्याला आईचा फोन सापडला; अन् त्यानं मागवलं साडे पाच हजाराचं जेवण

Next

आजकालची लहान मुलं एक्टीव्ह असतात. तर काही खूपच आगाऊ असतात. लहान मुलांच्या हातात फक्त वस्तू सापडायचा उशीर आहे. कोणतंही गॅजेट सापडल्यानंतर लहान मुलं याच्या वापराबाबत कल्पना नसल्याने नसते उद्योग करून ठेवतात. अशीच घटना घडली आहे. आईचा फोन हाती लागल्यानंतर या चिमुरड्याने केलेला पराक्रम वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.

ब्राझीलमधील मुलाने कहर केला असून त्याने आपल्या आईच्या मोबाइलवरुन चक्क साडे पाच हजारांचं जेवण मागवलं. आईचा मोबाइल हाती येताच मॅकडॉनल्डला फोन करुन साडे पाच हजारांची ऑर्डर देऊन टाकली. मुलाच्या आईने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता फोटोमध्ये मुलगा ऑर्डर केलेल्या जेवणासोबत बसलेला दिसत आहे. यावेळी त्यांनी हे पहिल्यांदाच झालेलं नाही असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या मुलाने नेमकं काय काय मागवलं याची यादीच सोबत दिली आहे. मी हसले, रडले आणि नंतर सोबत बसून जेवणाचा आनंद घेतला सांगत महिलेने आपली काय परिस्थिती झाली होती हे सांगितलं आहे. 

शाब्बास पोरी! ६० म्हशींचा सांभाळ अन् २ मजल्यांचा गोठा, पारनेरच्या मराठमोळ्या श्रद्धाचा प्रवास

असे अनुभव प्रत्येकालाचा आयुष्यात येत असतात. तुमच्याही घरातील लहान मुलांनी असं काही तरी केल्याची घटना तुम्हाला नक्कीच आठवली  असेल.  ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मुलाचा हा निरागसपणा पाहून नेटकरी प्रेमात पडले आहेत.सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

त्रिवार सलाम! महामारीमुळे कोरोना योद्धांची होतेय दयनीय अवस्था; ८ महिन्यांनी बदलला नर्सचा चेहरा

Web Title: Viral Video : Four year old kid uses mom phone to order fast food worth 5500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.