ट्रकमधून डॉलरचा पाऊस, लोकांच्या गर्दीने हायवे जाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 03:30 PM2018-12-18T15:30:37+5:302018-12-18T15:32:59+5:30
जेव्हा तुम्हाला रस्त्यावर, पार्कमध्ये किंवा इतरही कुठे पैसे सापडले तर तुम्ही काय करता? बहुतेक लोक तर नक्कीच ते पैसे खिशात ठेवत असतील.
जेव्हा तुम्हाला रस्त्यावर, पार्कमध्ये किंवा इतरही कुठे पैसे सापडले तर तुम्ही काय करता? बहुतेक लोक तर नक्कीच ते पैसे खिशात ठेवत असतील. कारण पैशाला कुणीही नाही म्हणत नाही. अशात जर तुम्ही रस्त्याने जाताय आणि एकाएकी रुपयांचा नाही तर डॉलरला 'पाऊस' झाला तर? खरंतर अशी एक घटना नुकतीच न्यू जर्सीमध्ये घडली आहे. या घटनेने हे सिद्ध केलं आहे की, माणूस कोणताही असो त्याला पैशांशी जास्त प्रेम आहे. झालं असं की, या घटनेमुळे गुरुवारी एका रस्त्यावर चांगलंच ट्रॅफिक जाम झालं.
मीडिया रिपोर्टनुसार, मेटलाइफ स्टेडियमजवळ एका रस्त्यावर अजिब घटना घडली. या रस्त्यावरुन जाताना एका ट्रकमधून पैशांचा अक्षरश: पाऊस झाला. म्हणजे या ट्रकमधून चक्क डॉलर उडायला लागले. मग काय...रस्त्यावरील लोकं गाड्या थांबवून थांबवून डॉलर वेचू लागले. आश्चर्य म्हणजे या लोकांनी त्यांच्या गाड्या रस्त्यातच उभ्या केल्याने ट्रॅफिक जाम झालं होतं. रदरफोर्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी या मार्गावरुन डॉलरने भरलेला एक ट्रक गेला होता.
No joke.... it’s SNOWING money! Accident involving a Brink truck on Route 3 in East Rutherford sends cash flying. 💰 ❄️ @ABC7NYpic.twitter.com/zASqW6idG1
— Nick Amador (@NickAmadorTV) December 13, 2018
दरम्यान पोलिसांनी लोकांना विनंती केली आहे की, ज्यांनी येथून पैसे नेले त्यांनी परत आणून द्यावेत. डिटेक्टिव माईक यांनी प्रसारमाध्यमाला सांगितले की, 'आम्ही कुणावरही कोणतीही कारवाई करणार नाहीत. फक्त ते पैसे परत मिळावे हाच उद्देश आहे'.
Approx 8:30am ERPD received calls of an armored truck spilling cash along Rt 3 West, motorists exited vehicles attempting to remove cash causing multiple MV Crashes. Detectives are investigating. We ask any person with info or video of this incident, call ERPD 201-438-0165
— East Rutherford Police (@ERutherfordPD) December 13, 2018
We have had several individuals contact ERPD & return money in this case. We would like to advise people if they have any money connected to this incident to contact ERPD at 201-438-0165 to make arrangements for its return with no charges filed.
— East Rutherford Police (@ERutherfordPD) December 13, 2018
पोलिसांनी माहिती दिली की, ट्रकच्या दरवाज्याच्या लॉकमध्ये काही अडचण होती. त्यामुळे ट्रकमधून पैसे खाली पडलेत. ते हेही म्हणाले की, आम्हाला हे माहीत नाही की, ट्रकमध्ये किती पैसे होते'.