विराटची दाढी, सचिनचे गाल, युवराजचं नाक ओढण्याची आणि धवनला पोटात गुद्दे घालण्याची हिंमत?..
By admin | Published: May 3, 2017 03:03 PM2017-05-03T15:03:50+5:302017-05-03T15:03:50+5:30
हो, विराटला उचकवण्याची हिंमत असलेली आहे एक व्यक्ती..
Next
- मयूर पठाडे
विराट कोहलीच्या दाढीचे केस उपटायची हिंमत? आहे कोणात? विराटच्या साधं जवळ जायलाही जगभरातले बॉलर तर जाऊ द्या, पण त्यांनी टाकलेले बॉलही घाबरतात. कारण आपण टाकलेल्या बॉलचं काय होईल हे त्या बॉलर्सना आणि बॉललाही माहीत असतं. थोडासाही चुकारपणा केला तर हा माणूस आपल्याला उचलून पटकणार, सीमापार तडाखा देणार किंवा उचलून सरळ बॉऊण्ड्रीवरून बाहेर भिरकावून देणार, हे निश्चित.
आणि विराटचा इतिहासही काही असा प्रेमळ नाही. कुणाचं चुकलं तर त्याला प्रेमानं काही सांगेल, आंजारुन, गोंजारून समजावून सांगेल. छे !
कोणी अरे केलं तर हा कारे करणारच.
ही हिंमतवान व्यक्ती आहे हिनाया!.
हरभजन सिंगची नऊ महिन्यांची मुलगी!
हरभजन आणि गीता बसरा यांना गेल्या वर्षी जुलैमध्यें लंडनमध्ये मुलगी झाली. तिच ही हिनाया.
अजून ती वर्षभराचीही झाली नाही तरी तिची ही हिंमत.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे!
हरभजन मैदानावर कितीही संतापी असला तरी जवळपास सगळ्याच क्रिकेटपटूंशी त्याचा याराना आहे.
सध्या आयपीएलचा दहावा हंगाम सुरू आहे. त्यात हरभजन मुंबई इंडियन्सकडून खेळतो आहे. हे सामने पाहण्यासाठी अर्थातच क्रिकेटपटूंचे कुटुंबियही हजर असतात. मैदानावरचे सामने कितीही अटीतटीचे होत असले तरी क्रिकेटपटूंसाठी त्यांच्या कुटुंबियांतील संवाद आणि भेटी ही त्यातली आनंदाची झुळुक.
आनंदाची ही लहर फुलवण्याचं काम सध्या हिनाया करते आहे.