वोडकाचे सहा आरोग्यवर्धक फायदे

By Admin | Published: September 18, 2016 12:34 PM2016-09-18T12:34:32+5:302016-09-18T12:34:32+5:30

वोडका हाही एक मदयाचाच प्रकार आहे. परंतु, याच्या प्रमाणशीर सेवनाचे फायदे जाणून घ्याल तर, आश्चर्य चकीत व्हाल. म्हणूनच घ्या जाणून वोडका पिण्याचे ६ फायदे.

Vodka's six health benefits | वोडकाचे सहा आरोग्यवर्धक फायदे

वोडकाचे सहा आरोग्यवर्धक फायदे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १८ : वोडका म्हटले की साहजिकच दारुचा एक प्रकार असा विचार आपल्या मनात येतो. वोडका सुरूवातीला केवळ रशियातच मोठ्या प्रमाणात पिला जात असे. परंतु, वोडका आता जगभरात प्रसिद्ध झाला असून तो जगभरात पिला जातो. वोडका प्यायल्याने नशा चढते हे जितके खरे तितकेच वोडक्याचे काही आरोग्यवर्धक फायदेही आहेत. वोडकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियमसारखी तत्वे असतात. तसेच यात कॅलरीजही असतात. 

कोणतेही व्यसन तसे वाईटच. परंतु, व्यसनासाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट वाईट असतेच असे नाही. वाईट असतो तो केलेला अतिरेक. मग, तो अतिरेक कोणत्याही गोष्टीचा का असेना. हा अतिरेक म्हणजेच व्यसन. कोणत्याही प्रकारचे मद्य सेवन करणे हे ही आपल्याकडे व्यसन म्हणूनच पाहिले जाते. 

तरूणाई आणि अनेक मद्यपी लोकांमध्ये भलतीच लोकप्रीय असलेली असलेला वोडका हाही एक मद्याचाच प्रकार आहे. परंतु, याच्या प्रमाणशीर सेवनाचे फायदे जाणून घ्याल तर, आश्चर्य चकीत व्हाल. म्हणूनच घ्या जाणून वोडका पिण्याचे ६ फायदे.

१) ताप आणि डोकेदुखीचा त्रास सतावत असल्यास वोडकाने आराम मिळतो. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास वोडका पाण्यात टाकून त्यात टॉवेल भिजवून तो पिळून डोक्यावर ठेवा. यामुळे डोकेदुखी दूर होते. 

२) दातदुखीचा त्रास होत असल्यास वोडकाचे काही थेंब दुखत असलेल्या जागी लावल्याने दातदुखी दूर होते. 

३) त्वचा लालसर झाल्यास अथवा एखादा कीटक चावल्याने त्वचा लाल झाल्यास त्यावर वोडका लावावा. 

४) वोडक्याचे काही थेंब शाम्पूमध्ये मिक्स करुन ते केसांना लावा. यामुळे फायदा होतो. 

५) कान दुखत असल्यास वोडकाचे काही थेंब टाकून ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर कान साफ करा. यामुळे कानदुखी थांबेल. 

६)त्वचा उजळवण्यासाठीही वोडकाचा वापर होतो. कॉटनवर काही थेंब वोडकाचे घेऊन ते त्वचेवर लावा.

Web Title: Vodka's six health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.