रेस्टॉरंटमध्ये काहीवेळा आवडीची जागा का मिळत नाही? वेट्रेसने केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 07:19 PM2021-11-04T19:19:23+5:302021-11-04T19:56:45+5:30
अनेकदा तुम्हाला तुमच्या आवडीच्या जागी बसू दिलं जातं. तर काही वेळा असंही होऊ शकतं की ती जागा रिकामी असूनही तुम्हाला तिथे बसू दिलं जात नाही. कधी तुम्ही याचा विचार केला आहे का की तुम्हाला तुमच्या आवडीचा टेबल का दिला गेला नाही? ग्राहकांना टेबल अलॉट करण्याबाबत नुकतंच अमेरिकेतील एका वेट्रेसने (American Waitress) धक्कादायक खुलासा केला आहे.
तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जात असाल तेव्हा आपल्या आवडीचा टेबल मिळावा (Favorite Table at Restaurant) यासाठी तेथील कर्मचाऱ्यांसोबत बोलत असाल. अनेकदा तुम्हाला तुमच्या आवडीच्या जागी बसू दिलं जातं. तर काही वेळा असंही होऊ शकतं की ती जागा रिकामी असूनही तुम्हाला तिथे बसू दिलं जात नाही. कधी तुम्ही याचा विचार केला आहे का की तुम्हाला तुमच्या आवडीचा टेबल का दिला गेला नाही? ग्राहकांना टेबल अलॉट करण्याबाबत नुकतंच अमेरिकेतील एका वेट्रेसने (American Waitress) धक्कादायक खुलासा केला आहे.
लॉस एंजेल्सची (Los Angeles) टिकटॉकर ब्रूक स्कोफील्डमध्ये (Brooke Schofield) एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. टिकटॉकवर @brookeschofield1 नावाचं तिचं अकाऊंट अतिशय लोकप्रिय आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रूकने नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिनं थक्क करणारा खुलासा केला. ब्रूक एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. तिनं व्हिडिओमध्ये सांगितलं, की तिचा बॉस नेहमी तिला सांगत असे की रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्यांमध्ये जे दिसायला चांगले नसतील त्यांना मागील बाजूचे टेबल द्यायचे आणि जे सुंदर असतील त्यांना दरवाजाशेजारचे किंवा खिडकीजवळचे टेबल द्या. हे समजल्यावर अनेक लोक हैराण झाले.
लोकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी म्हटलं की लोकांसोबत अशाप्रकारे भेदभाव करणं चुकीचं आहे. तर काहींनी या पॉलिसीची थट्टा उडवली आहे. एका व्यक्तीनं म्हटलं, की मी इतका खास आहे की माझ्यासाठी तर पूर्ण रेस्टॉरंटच रिकामं केलं जाईल. आणखी एकानं कमेंट करत सांगितलं, की एकदा मी माझ्या कुटुंबीयांसोबत रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तेव्हा आम्हाला बेसमेंटमध्ये बसवण्यात आलेलं. आणखी एका व्यक्तीनं कमेंट करत सांगितलं की तो ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करतो, तिथे विंडो सीट केवळ मॉडेलप्रमाणे दिसणाऱ्यांनाच दिली जाते. काही रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी या तरुणीला चुकीचं ठरवत सांदितलं की असा भेदभाव प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये होत नाही.