अचानक डोक्यात जोरात वेदना झाली, डॉक्टर म्हणाले मायग्रेन; पण सत्य धक्कादायक होतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:58 PM2024-10-02T16:58:21+5:302024-10-02T17:00:22+5:30

डॉक्टर म्हणाले की, मायग्रेन असू शकतो. पण जेव्हा त्यांची पुन्हा टेस्ट करण्यात आली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

Wales ex army man got headache found brain tumor stage 4 cancer | अचानक डोक्यात जोरात वेदना झाली, डॉक्टर म्हणाले मायग्रेन; पण सत्य धक्कादायक होतं!

अचानक डोक्यात जोरात वेदना झाली, डॉक्टर म्हणाले मायग्रेन; पण सत्य धक्कादायक होतं!

मानवी शरीर फारच अजब आहे. लोकांना नेहमीच छोट्या-मोठ्या समस्या होत असतात. त्यामुळे लोक हॉस्पिटलमध्ये न जाता या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पण अनेकदा या छोट्या समस्या नंतर गंभीर निघतात. वेल्समध्ये राहणाऱ्या एका माजी सैनिकासोबत असंच काहीसं झालं. या व्यक्तीचं डोकं अचानक दुखू लागलं होतं. तो डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरांना हे सामान्य दुखणं असल्याचं सांगितलं. डॉक्टर म्हणाले की, मायग्रेन असू शकतो. पण जेव्हा त्यांची पुन्हा टेस्ट करण्यात आली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

न्यूयॉर्क पोस्ट वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, रॉयल मरीनेचे माजी सैनिक ४५ वर्षीय जेम्स ग्रीनवुड वेल्समध्ये त्यांच्या ३१ वर्षीय गर्लफ्रेन्डसोबत राहत होते. यावर्षी मे महिन्यात ते बहिणीच्या पतीसोबत फोनवर बोलत होते. तेव्हा अचानक त्यांना चक्कर आली आणि त्यांचं डोकं दुखू लागलं होतं. ५ जूनला ते डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांना डिहायड्रेशन किंवा डोळ्यांवर दबाव पडल्यामुळे असं होत असेल. त्यांनी डोळ्यांची टेस्ट करण्यास सांगण्यात आलं.

डॉक्टरांनी सांगितला मायग्रेन

त्यांची ब्लड टेस्ट झाली, ईसीजी काढला, पण चिंता करण्यासारखी काही आढळलं नाही. नंतर १० जूनला ते मॅनटेस्टरमध्ये होते. तेव्हा त्यांच्यासोबत एक घटना घडली. ते रस्त्याने चालत असताना अचानक त्यांच्या डोक्यात जोरात वेदना झाली. त्या दिवशीच ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले की, तुम्हाला मायग्रेन आहे. अशात त्यांनी मायग्रेनची औषधं लिहून दिली. १ आठवड्यांनी पुन्हा चेकअपसाठी बोलवलं. पण १२ जूनला पुन्हा त्यांचं डोकं दुखत होतं. त्यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तेव्हा त्यांचा सीटी स्कॅन करण्यात आला. तेव्हा समजलं की, त्यांच्या मेंदुच्या उजव्या टेंपोरल लोबमध्ये अक्रोडच्या आकाराचं मांस वाढलं आहे. तो एक ब्रेन ट्यूमर होता. हे समजल्यावर त्यांना धक्का बसला.

जेम्सची ब्रेन सर्जरी करण्यात आली आणि २८ जूनला त्यांचा ब्रेन ट्यूमर काढण्यात आला. ऑगस्टमध्ये समजलं की, त्यांना चौथ्या स्टेजचा ग्लियोब्लास्टोमा आहे, ज्याला ब्रेन कॅन्सरचं सगळ्यात खतरनाक रूप मानलं जातं. नंतर त्यांच्यावर कीमोथेरपी करण्यात आली. कीमोथेरपीनंतर जेम्स उपचाराचा फायदा झाला की नाही याची वाट बघत होते. जर फायदा झाला असेल तर ऑक्टोबरच्या शेवटी त्यांच्यावर इंटेन्स कीमोथेरपी केली जाईल. आता त्यांचे काही मित्र त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करत आहेत. सोबतच जेम्स म्हणाले की, त्यांना विश्वास बसत नाहीये की, त्यांच्यासोबत हे सगळं होत आहे. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत आहे.

Web Title: Wales ex army man got headache found brain tumor stage 4 cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.