जगातला सर्वात मूर्ख गुन्हेगार, 7 वर्षांपासून होता फरार; नोकरी मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:21 PM2022-09-16T12:21:20+5:302022-09-16T12:24:34+5:30
Crime News : तसे तर कोणतेही गुन्हेगार हे खूप हुशार असतात, पण दक्षिण आफ्रिकेतील एक गुन्हेगार स्वत:च पोलिसांच्या अडकला. तो सात वर्ष पोलिसांच्या हाती लागला नाही.
Crime News : गुन्हे विश्वातील अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. अनेक खतरनाक गुन्हेगारांचे किस्से ऐकून अंगावर काटा येतो. त्यांचा परिवार, त्यांच्या बालपणीच्या गोष्टी, गुन्हेगार बनण्याचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्याच गुन्हेगाराची कहाणी सांगणार आहोत. ज्याला सर्वात मूर्ख गुन्हेगार म्हटलं जातं.
तसे तर कोणतेही गुन्हेगार हे खूप हुशार असतात, पण दक्षिण आफ्रिकेतील एक गुन्हेगार स्वत:च पोलिसांच्या अडकला. तो सात वर्ष पोलिसांच्या हाती लागला नाही. पण एक दिवस पोलीस स्टेशनमध्येच नोकरी मागण्यासाठी गेला. तसं तर हे फारच अजब काम होतं. पण थॉमस नगकोबोने हेच केलं. स्वत; पोलिसांनाही सात वर्षांपासून फरार गुन्हेगार त्यांच्या हाती अशाप्रकारे लागेल याची कल्पना नव्हती.
40 वर्षांपासून साऊथ आफ्रिकन गुन्हेगार थॉमस नगकोबोवर 2015 मध्ये हार्डवेरची चोरी करण्याचा आरोप होता. त्याने 95 हजारांपेक्षा जास्तची चोरी केली होती. त्याने दुकानातून अनेक डिलीवरीज डायरेक्ट केल्या होत्या आणि मालकाला न सांगता अनेक प्रॉडक्ट्स वेगळ्या पत्त्यावर पाठवले होते. या घटनेनंतर त्याचं नाव पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टवर आलं होतं. गेल्या सात वर्षांपासून थॉमस पोलिसांपासून पळत होता. पोलिसांना त्याला पकडता आलं नाही. नंतर एक दिवस तो स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये आला.
जो गुन्हेगार पोलिसांना इतक्या वर्षांपासून पळवत होता, तो 7 वर्षांनंतर 15 ऑगस्टला Mpumalanga पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. येथील प्रवक्त्याने सांगितलं की, 40 वर्षीय गुन्हेगार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी आला होता. त्याने नोकरीसाठी अर्ज केला होता. ज्याचं काहीच उत्तर आलं नाही. कारण त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड होता. अशात त्याला अटक करण्यात आली. आफ्रिकन मीडियानुसार, पोलिसांनी हे मोठं यश असल्याचं सांगितलं. उलट थॉमस स्वत: पोलीस स्टेशनमध्ये आला होता. सोशल मीडियावर त्याची स्टोरी व्हायरल झाल्यावर लोक त्याला मूर्ख गुन्हेगार म्हणत आहेत.