'ही' होती जगातील सर्वात सुंदर महिला, पण 'या' आजाराने केले जगातील सर्वात कुरुप...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:15 PM2021-07-16T18:15:19+5:302021-07-16T18:16:02+5:30
जगात एक अशी महिला होऊन गेली जी दिसायला खुप सुंदर होती. मात्र अचानक ती कुरुप झाली आणि जगात सर्वात कुरुप महिला म्हणून ओळखली जाऊ लागली...
जगात अनेक सौंदर्यवती आहेत. सौंदर्यवती स्पर्धांमध्ये तर अनेक ललना आपल्या सौंदर्याने भल्यभल्यांना घायाळ करतात. पण हे सौंदर्य किती काळ टिकेल याची काय खात्री? जगात एक अशी महिला होऊन गेली जी दिसायला खुप सुंदर होती. मात्र अचानक ती कुरुप झाली आणि जगात सर्वात कुरुप महिला म्हणून ओळखली जाऊ लागली. मेरी एम बेवन असे या महिलेचे नाव होते. चला तर मग जाणून घेऊया या महिलेची गोष्ट आणि ती जगात सर्वात कुरुप महिला का झाली?
काही आजार असे असतात की ते काही व्यक्तींचे आयुष्य उद्भवस्त करून टाकतात. अशाच एका दुर्धर आजाराने या सुंदर युवतीचे आयुष्य कुरुप करून टाकले. जवळजवळ १४७ वर्षांपूर्वी म्हणजेच १८७४ साली तिचा जन्म झाला. ती प्रचंड सुंदर होती. लंडनमध्ये जन्म झालेली मेरी आठ मुलांमधील एक होती. ती दिसायला फार सुंदर होती. तिचे नर्स व्हायचे स्वप्न होते पण ते अर्धवट राहिले. तिचे लग्न झाले.
डेली स्टार डॉट कॉम या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार मेरीचे लग्न झाले. तिला ४ मुले होती. त्यावेळी मेरीला अॅक्रोमेगाली नावाचा आजार झाला. ज्यात शरीरातील अवयव मोठे होत जातात व चेहरा आणि शरीर कुरुप दिसू लागतो. त्या दरम्यान तिच्या नवऱ्याचे निधन झाले. बिचारी मेरी एकटी पडली. तसेच तीची आर्थिक परिस्थीतीपण हलाखीची बनली. पण असं म्हणतात की प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट दडलेली असते. मेरीच्या कुरुपतेमुळे तिला अर्थार्जनाचा मार्ग सापडला. अमेरिकेच्या एका सर्कशीत चित्रविचित्र दिसणाऱ्या माणसांचा शो होता. ज्यात मेरी सहभागी झाली. या शो मुळे तिला प्रसिद्धीही मिळाली व तिला पैसेही मिळु लागले.