“मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून लग्न करून द्या” युवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

By प्रविण मरगळे | Published: January 12, 2021 10:20 AM2021-01-12T10:20:59+5:302021-01-12T10:32:40+5:30

वाशिममधील युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या अशी अनोखी मागणी केली आहे.

Washim Youth direct letter to Chief Minister Uddhav Thackeray for give job | “मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून लग्न करून द्या” युवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

“मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून लग्न करून द्या” युवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देतुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत, त्यामुळे जॉब मिळणेही कठीण झालं आहेमाझं वय ३५ वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही, त्याचं कारण गेल्या ७ वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते

मुंबई – कोरोना संकटकाळात अनेकांचे रोजगार गेले, सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले, या लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमुकल्यांनी पत्र लिहून घरातील व्यथा सांगितल्याचं आपण वाचलं असेल, आता एका तरूणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं असून या पत्रातील मजकुरामुळे ते प्रचंड व्हायरल होत आहे.

वाशिममधील युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या अशी अनोखी मागणी केली आहे. गजानन राठोड असं या युवकाचं नाव आहे, या पत्रात गजानननं म्हटलंय की, माझं वय ३५ वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही, त्याचं कारण गेल्या ७ वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, परंतु कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही, जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते. (Washim Youth Writes Letter to CM Uddhav Thackeray)

तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत, त्यामुळे जॉब मिळणेही कठीण झालं आहे, त्यामुळे मला एकतर जॉब द्यावा अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे अशी अजब मागणी गजानन राठोडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधीही अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या व्यथा कळवल्या होत्या, यात लहानग्या चिमुकल्यांनीही लिहिलेली पत्र भावनात्मक होती तर काहींची मागणी ऐकून हसू आवरत नव्हते.

बीडमधील एका तरूणाने मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दोन वर्षापूर्वी लिहिलं होतं, मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या तरूणाने ही मागणी केली होती, तसेच त्याच्या मूळ गावापासून लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत पायी यात्राही काढली होती. हा तरूणही त्यावेळी जोरदार चर्चेत आला होता, आता वाशिमच्या युवकाने केलेल्या मागणीही जोरदार व्हायरल होत आहे.

Web Title: Washim Youth direct letter to Chief Minister Uddhav Thackeray for give job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.