VIDEO : सुपर मॉम! इमारतीला लागली आग, मुलांना वाचवण्यासाठी आईने केलं 'हे' काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 10:18 AM2021-02-27T10:18:37+5:302021-02-27T10:22:45+5:30
इथे एका इमारतीला आग लागल्यानंतर एका घरात आपल्या लेकरांसोबत अडकलेल्या आईने त्यांना वाचवण्यासाठी त्यांना तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकलं.
आई आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकते याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून लोक भावूक झाले आहेत. ही घटना आहे तुर्कीच्या इस्तांबुलची. इथे एका इमारतीला आग लागल्यानंतर एका घरात आपल्या लेकरांसोबत अडकलेल्या आईने त्यांना वाचवण्यासाठी त्यांना तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकलं.
हा व्हिडीओ ट्विटरवर @DailySabah ने शेअर केला आहे. त्यांच्यानुसार, ही घटना बुधवारी इस्तांबुलच्या एसेलर डिस्ट्रिक्टमध्ये घडली. इथे एका ५ मजली इमारतीला आग लागली होत. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चार मुलांसोबत एक आई अडकली होती. तिने आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी त्यांना एक एक करून खिडकीतून खाली फेकलं. खाली उभे असलेल्या काही लोकांना चादरीमध्ये या मुलांना कॅच केलं.
Mother saves her 4 children during fire in Turkey’s Istanbul by throwing them out of 3rd floor windowhttps://t.co/LFBi2mv41Upic.twitter.com/g8pgdf1mO7
— DAILY SABAH (@DailySabah) February 25, 2021
Yes she did pic.twitter.com/ldXaZMFOhH
— B (@IAmBrendanWitek) February 25, 2021
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलं आणि त्यांची आई ठीक आहे. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, 'आधी बिल्डींगमधून काळा धूर येऊ लागला होता आणि नंतर खिडकीतून मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. आम्ही चादर आणली आणि महिलेने तिच्या मुलांना एक एक करून चादरीवर फेकलं. आम्ही त्यांना वाचवलं. नंतर फायर ब्रिगेडने आग विझवण्यात आली.