पाकिस्तानात अजब यंत्र! रस्सी खेचताच सत्ताधारी नेत्यांना चपलेचा मार; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 04:44 PM2022-08-19T16:44:36+5:302022-08-19T16:44:52+5:30
ही नवीन टेक्नोलॉजी असणारी मशीन इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इंसाफच्या कार्यकर्त्यांनी बनवली आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या राजकारणात नेहमीच काहीतरी अजबगजब होत असतं. राजकीय नेत्यांविरोधात प्रदर्शने करणं याठिकाणी नवीन गोष्ट नाही. जेव्हापासून इमरान खान यांना सत्तेतून हटवण्यात आले आहे. तेव्हापासून सातत्याने शाहबाज शरीफ सरकारविरोधात आंदोलने सुरु आहेत. याचवेळी पाकिस्तानच्या प्रदर्शनात एक अनोखी मशीन पाहायला मिळाली.
ही नवीन टेक्नोलॉजी असणारी मशीन इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इंसाफच्या कार्यकर्त्यांनी बनवली आहे. रिटायर्ड मेजर गौरव आर्य यांनी याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मशीनमध्ये पाकिस्तान सरकारमध्ये सत्तेत बसलेल्या राजकीय नेत्यांचे फोटो लावले आहेत. जेव्हा ही मशीन चालवली जाते तेव्हा त्या फोटोंना चपलांचा मार पडतो. पाकिस्तानच्या स्टार्टअपमध्ये इकोसिस्टम वास्तवमध्ये जुने झाले आहे. परंतु ही ऑटोमॅटिक मशीन सर्वात नवीन अविष्कार आहे असं कॅप्शन मेजर गौरव आर्य यांनी ट्विटच्या कॅप्शनला दिले आहे.
The start up ecosystem in Pakistan has truly come of age. This #AutomaticLaanatMachine is the latest invention from the land of the pure. pic.twitter.com/qarqf3PsSA
— Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) August 18, 2022
मशीन कसे काम करते?
व्हिडिओमध्ये काही लोक रस्सी ओढताना दिसत आहेत. जेव्हा ते रस्सी ओढतात तेव्हा या चप्पल फोटोंवर मारल्या जातात. हा व्हिडिओ साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळी कमेट्ंस करत आहेत. पाकिस्तानी लोकांचा हा अविष्कार पाहून अनेकजण त्यांची खिल्ली उडवत आहेत. एका युजरने लिहिले की हा एक अद्भुत शोध आहे, पाकिस्तान विकसित देश नाही असं म्हणतात त्यांनी पाहावं.
पाकिस्तानी सरकारविरोधात इमरान खान
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडत आहेत. बुधवारी ते म्हणाले की, देश बनाना रिपब्लिक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. इमरान खान यांचे हे विधान त्यांचे निकटवर्तीय आणि वरिष्ठ पीटीआय नेते शाहबाज गिल यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आले आहे.