झाडांसाठी पाणी जीवनच

By admin | Published: July 10, 2015 09:51 PM2015-07-10T21:51:43+5:302015-07-10T21:51:43+5:30

पैष्टिक घटक शोषून घेऊन झाडाच्या नेमक्या भागांना मिळण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते. खूप जास्त किंवा कमी प्रमाणात पाणी हे झाडांसाठी घातक ठरतं.

Water life for plants | झाडांसाठी पाणी जीवनच

झाडांसाठी पाणी जीवनच

Next

ऐश्वर्या अमित पाटकर
पैष्टिक घटक शोषून घेऊन झाडाच्या नेमक्या भागांना मिळण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते. खूप जास्त किंवा कमी प्रमाणात पाणी हे झाडांसाठी घातक ठरतं. दैनंदिन कामाच्या व्यापात पाणी देणं राहून गेलं की झाडांची काय अवस्था होते ती आपल्यासाठी नवीन नाही. कमी पाणी झालं की झाडाला तर पाणी मिळत नाहीच पण मुळांना ीिँ८१िं३्रङ्मल्ल होऊन मुळे सुकतात. खूप सुकलेली मुळे पुन्हा जीव धरत नाहीत. म्हणून नंतर कितीही पाणी घातलं तरी झाड मरून जातं. पाणी खूप झालं की मुळांना, पुरेसा ड७८ॅील्ल मिळत नाही, अश्यावेळेस सुद्धा मुळांची हीच परिस्थती होऊन झाडावर तोच परिणाम होतो. दुर्दैवाने झाडाला किती पाणी घालावं याचं निश्चित मोजमाप नाही, त्यामुळे खूप गोंधळ उडतो. केवळ छान दिसतं म्हणून झाड न घेता, ते मुळात कुठल्या प्रदेशातलं आहे हे समजून घ्यावं म्हणजे पाण्याची आर्द्रता किती हवी आणि ड७८ॅील्ल किती हवा हे समजून घेता येतं. एकदा नवीन झाडाचा अंदाज आला की मग पुरेसं पाणी देणं सोपं जातं. उन्हाळ््यात आपल्याला जास्त तहान लागत असेल तर झाडांना ही पाणी जास्त हवं आहे हे समजावं, पावसाळ््यात किंवा हिवाळ््यात, आपल्याला पाणी कमी लागलं... म्हणजे झाडांना ही कमी पाण्याची आवश्यकता आहे असे समजावे. सर्व साधारण झाडांसाठी माती मध्ये आपलं बोट एक इंच खोचून माती खूप सुकी किंवा खूप ओली नाही याची खात्री करावी.
-------
झाडांना पाणी घालताना, कुंडीत जास्त झालेले पाणी निघून जाईपर्यंत घालावे. जर उङ्मूङ्म ढीं३ मध्ये आपली झाडं असतील तर अंदाज येण्यासाठी बोटाने २ इंचावर आर्द्रता तपासावी, कारण उङ्मूङ्म ढीं३ पाणी जास्त वेळ धरून ठेवते. परंतु जमिनीत लावलेल्या झाडांना नीट अंदाज बांधून आणि स्वत:चा अनुभव गाठीला ठेऊन पाणी घालावे. आणखी एक गोष्ट अत्यंत गरजेची नसली तरी झाडं चांगली वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ती म्हणजे झाडांवर पाण्याने फवारणी करणे. तो केल्याचा फायदा मी खूप अनुभवला आहे.
------------
मे महीना म्हणजे बाहेर गावी फिरायला जाण्याचा महीना. अश्या वेळेस झाडांना पाणी घालणं ही एक समस्या उभी राहते. मी ठिबक सिंचन बसवून घेतलंय. माङयाकडे पुष्कळ झाडं आहेत म्हणून ते बरं पडतं. पण कमी झाडं असली तर आणखी एक उपाय आहे, जो मी पूर्वी २-३ वेळा केलाय आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वीही झाले आहे.
--------------
शीत पेयाची प्लास्टिकची बाटली घ्यावी आणि बाटलीच्या तळाच्या थोडं वर, खूप बारीक भोक पाडावे. तसेच एक भोक विरु द्ध दिशेला बाटलीच्या गळ््याकडे पाडावे ( सुई पूर्ण जाईल इतकं चालेल). बाटलीत पाणी भरावे आणि घट्ट बंद करून तळाकडील भोक झाडाच्या मुळाकडे मातीच्या दिशेला येईल अशी बाटली तिरकस ठेवावी. हा प्रयोग आधी करून पाहावा म्हणजे काही चुकतंय का?, किंवा किती दिवस पाणी पुरतं?, झाडाला तितकं पाणी पुरेसं आहे का? हे सगळं गणित जुळवून आणणं महत्वाचं आहे. आपल्या आवडत्या झाडांच्या पाण्याची चिंता न करता फिरायला जाता येणं यात काय सुख आहे ते अनुभवा!!

Web Title: Water life for plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.