लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 04:37 PM2021-01-28T16:37:55+5:302021-01-28T16:41:31+5:30

कॅनडामध्ये कोरोना वॅक्सीनेशन हळुवार होत असल्याने सरकारवर टीका होत आहे. कॅनडातील अनेक लोक वॅक्सीन घेण्यासाठी अमेरिकेतही जात आहेत.

Wealthy couple chartered a plane and jumped covid vaccine line loses job | लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही...

लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही...

Next

कॅनडातील एका श्रीमंत व्यक्ती सीईओ पदाची नोकरी गेली कारण तो वेळेआधीच कोरोना वॅक्सीन घेण्यासाठी खोटं सांगून गेला होता. एका कॅसिनो कंपनीचा सीईओ रॉडनी बेकरने वेळेआधीच कोरोना वक्सीन घेण्यासाठी चार्टर्ड प्लेन हायर केलं आणि अभिनेत्री असलेल्या पत्नीसोबत कॅनडातील एका दूर भागात गेला होता. तिथे कपलने स्वत:ला एका हॉटेलचं कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं.

५५ वर्षीय रोडनी आपल्या ३२ वर्षीय पत्नी एकातेरिना बेकरला सोबत घेऊन वॅक्सीन लावण्यासाठी गेला होता. कॅनडातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोट्याधीश व्यक्तीने स्थानिक सिव्हिल इमरजन्सी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. कपल १९ जानेवारीला युकोनची राजधानी व्हाइटहॉर्सला पोहोचलं होतं. दोघांनी १४ दिवसांचा क्वारंटाइनही पूर्ण केला.

त्यांनी ते एका नव्या हॉटेलचे कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर त्यांना मॉडर्नाची वॅक्सीन देण्यात आली आहे. मात्र, आता त्यांचा भांडाफोड झाल्याने कपलला वॅक्सीनचा दुसरा डोज देण्यास उशीर होऊ शकतो.

कॅनडामध्ये कोरोना वॅक्सीनेशन हळुवार होत असल्याने सरकारवर टीका होत आहे. कॅनडातील अनेक लोक वॅक्सीन घेण्यासाठी अमेरिकेतही जात आहेत. तरी सुद्धा या कोट्याधीश कपलने लाइन तोडून वॅक्सीन घेतल्याने त्यांच्यावरही टीका होता आहे.

असेही सांगितले जात आहे की, या कपलने क्वारंटाईन नियमांचं पालन न केल्याने या परिसरातील इन्डिजनस लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचवला आहे. स्थानिक कायदा तोडल्याप्रकरणी कपलवर अधिकारिक रूपाने आरोप लागले आहेत. त्यांना लाखों रूपये दंड भरावा लागू शकतो.

या कपलचा भांडाफोड तेव्हा झाला जेव्हा स्थानिक लोकांना त्यांच्यावर संशय आला. आधी लोकांनी कपलने सांगितलेल्या हॉटेलमध्ये फोन करून विचारले की, ते तिथे काम करतात का. सकारात्मक उत्तर न मिळाल्याने स्थानिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
 

Web Title: Wealthy couple chartered a plane and jumped covid vaccine line loses job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.