भागमभाग! लग्नात २० पेक्षा जास्त जणांची गर्दी; पोलीस येताच नवरा नवरीनं भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:22 PM2021-05-14T16:22:30+5:302021-05-14T16:42:23+5:30
लग्नात १५० ते २०० लोक सहभागी झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ते लगेच पोलीस दल घेऊन हॉलवर आले आणि लोकांची पळापळ झाली.
कोरोना महामारी बघता पंजाब सरकारने लग्नात नवरदेव आणि नवरीकडून केवळ २० लोकांना येण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. तरी सुद्धा काही लोक नियम धाब्यावर बसवून लग्नात ठरलेल्या लोकांपेक्षा जास्त लोकांना बोलवत आहेत.
पटियालाच्या राजपुरा टाउनमध्ये असलेल्या कमेटी सेंटरमध्ये एक अशीच घटना समोर आली. इथे आलेल्या वरातील नियम धाब्यावर बसवून १५० ते २०० लोक आले होते. जशी याची माहिती पोलिसांना मिळाली तसे ते पोलीस दल घेऊन घटनास्थळी पोहोचले. (हे पण वाचा : हेच राहिलं होतं! कोरोना पॉझिटिव्ह पतीला किडनी देण्यास पत्नीचा नकार, म्हणाली - आधी संपत्ती नावे करा....)
लग्नात नवरी-नवरीदेवासहीत पाहुणे लोक विना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची माती करत होते. पोलीस जसे कमेटी सेंटरच्या आत पोहोचले तसे नवरी-नवरदेव आणि पाहुणे भींतीवरून उड्या घेऊन पळायला लागले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्हाला बघून लग्नाच्या हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोक इकडे-तिकडे पळायला लागले होते. (हे पण वाचा : वाह रे वाह! पठ्ठयाने चक्क शरीरसंबंधासाठी केली ई-पासची मागणी, पोलिसांनी उचलून आणलं तर दिलं हे स्पष्टीकरण...)
पोलसांनी सांगितलं की, १५० ते २०० लोक लग्नात सहभागी झाले होते. तर नवरीच्या आईने सांगितलं की लग्नात केवळ २० लोक होते. पोलिसांनी नवरी आणि नवरदेव दोन्हीकडच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस म्हणाले की, कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
पंजाबमध्ये लग्नात गर्दीच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतीच अशाच एका केसमध्ये पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आजोबाला अटक केली होती. पोलीस म्हणाले की, कोरोना काळात जे नियमांकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत.