लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 11:07 AM2022-11-07T11:07:25+5:302022-11-07T11:07:48+5:30

Jarahatke : जोधापुरा ढाढकी गावात एका सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान अनेक जोडप्यांची लग्ने झाली. पण एका जोडीला उदास होऊन परत जावं लागलं.

Wedding bridegroom did not bring sandals bride refused to go to her in laws in Agra | लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

Next

Bride Groom News: तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, नवरीच्या दारात पोहोचलेल्या नवरदेवाला मनासारख्या वस्तू मिळाल्या नाही तर नवरेदवाने वरात परत नेली. पण उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातून एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे एक नवरी या कारणाने नाराज झाली, कारण नवरदेवाने तिच्यासाठी सॅंडल आणली नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना नगला गावातील आहे. इथे नवरदेवाला आपली वरात परत न्यावी लागली. वरात परत जाण्याआधी पंचायतच नाही तर पोलिसांनीही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने कुणाचं काही ऐकलं नाही. त्यामुळे नवरदेवाला लग्न न करताच वरात परत न्यावी लागली.

जोधापुरा ढाढकी गावात एका सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान अनेक जोडप्यांची लग्ने झाली. पण एका जोडीला उदास होऊन परत जावं लागलं. धौलपुरच्या मनियां भागातून आलेल्या एका कपलचं लग्न लागलं. पाठवणी होत असताना नवरीने सासरी जाण्यास नकार दिला. कारण नवरदेवाने तिच्यासाठी सॅंडल आणली नाही. यावरून नवरदेवाकडील लोकांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण यातून काहीच घडलं नाही. 

नवरीकडील लोकांनी आरोप केला की, वराती दारूच्या नशेत आले होते आणि त्यांनी गैरवर्तन केलं. काही लोकांनी हेही सांगितलं की, नवरदेवाला मिरगीचा झटकाही आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्हीकडील लोकांमध्ये पंचायतही झाली. पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. नवरीच्या हट्टासमोर सगळे हरले होते. शेवटी वरात घेऊन नवरदेवाला परत जावं लागलं.

Web Title: Wedding bridegroom did not bring sandals bride refused to go to her in laws in Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.