वेट लॉसच्या नादात महिलेचा राहिला फक्त सांगाडा; वजन 102 वरून 40 किलो; जाणून घ्या कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:57 AM2023-04-03T10:57:28+5:302023-04-03T11:03:34+5:30
दोन मुलांच्या आईने =वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली आहे. यामुळे वजन कमी झाले पण तिच्या कमी झालेल्या वजनामुळे ती नाराज झाली आहे आणि आता शरीराचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे.
आजकाल वजन कमी करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे, वजन कमी करण्याच्या गोळ्या, पेय, शस्त्रक्रिया इ. पण वजन कमी करण्याचे काही मार्ग असू शकतात जे तुमच्यासाठी आयुष्यभर समस्या बनू शकतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये दोन मुलांच्या आईने आपले वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली आहे. यामुळे तिचे वजन कमी झाले पण तिच्या कमी झालेल्या वजनामुळे ती नाराज झाली आहे आणि आता फक्त शरीराचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे.
ट्रेसी हचिंसन असं या महिलेचं नाव असून तिचे वय 52 वर्षे आहे. वॉशिंग्टनमधील रहिवासी असलेल्या ट्रेसीचे दोन वर्षांपूर्वीपर्यंत वजन सुमारे 102 किलो होते. वजन कमी करण्यासाठी तिने गॅस्ट्रिक बायपास सर्जरी केली होती. तिते वजन कमी झाले आहे, त्यानंतरही वजन सातत्याने कमी होत आहे. ट्रेसीने मुलाखतीदरम्यान डेली मेलला सांगितले की, 'माझा बीएमआयही जास्त होता, त्यामुळे जेव्हा मी डॉक्टरांना भेटले तेव्हा त्यांनी मला गॅस्ट्रिक बलून किंवा इंट्रागॅस्ट्रिक बलूनचा सल्ला दिला.
ट्रेसीने सांगितले की, 'मी शस्त्रक्रियेसाठी 5.09 लाख रुपये खर्च केले होते. जर मी हीच शस्त्रक्रिया ब्रिटनमध्ये केली असती तर मला तेथे सुमारे 8.15 लाख रुपये मोजावे लागले असते. यूकेच्या तुलनेत मला तुर्कीमध्ये शस्त्रक्रियेसाठी 3 लाख रुपये कमी खर्च करावे लागले, म्हणून मी तुर्कीमध्येच शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रियेनंतर एका व्यक्तीचे वजन सहा महिने कमी होते, जे माझ्यासोबतही घडले, पण आता मी खूप काळजीत आहे कारण 1 वर्षानंतरही माझे वजन सतत कमी होत आहे. माझ्या शरीराचे वजन फक्त 41 किलो आहे जे खूप कमी आहे. माझ्या शरीरात फक्त हाडं आणि त्वचा उरली आहे.
कंटाळून गॅस्ट्रिक सर्जरी केली
ट्रेसीने सांगितले की, 'गॅस्ट्रिक बलूनमधून वजन कमी केल्यानंतर मी निराश झाले आणि त्यानंतर मी तुर्कीमध्ये गॅस्ट्रिक बायपास करण्याचा निर्णय घेतला. गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियेत पोटात एक छोटी पिशवी तयार करण्यात आली. ही पिशवी अगदी कमी अन्नानेही भरत असे, त्यामुळे माझे पोट भरलेले वाटायचे आणि मी कमी अन्न खायचे शस्त्रक्रियेनंतर, त्याला पाच महिने चांगले ठेवण्यात आले आणि माझे वजन सुमारे 60 किलोवर आले. त्यानंतर जून 2022 मध्ये माझे लग्न झाले आणि त्यानंतर मला दोन मुले झाली. पण माझे वजन अजूनही सतत कमी होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"