Girlfriend ने वजनावरून हिणवलं; युवकानं स्वत:ला 'असं' बदललं की सगळे पाहतच राहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 02:49 PM2022-10-03T14:49:56+5:302022-10-03T14:52:56+5:30
मी पहिल्या दिवशी जिममध्ये १७ मिनिटे व्यायाम केला. त्यानंतर वेळ वाढवला. दीड वर्षात माझं वजन १०४ किलोहून ५९ किलोपर्यंत कमी झाले असं अर्जुनने म्हटलं.
नवी दिल्ली - वजन कमी करणं हे अनेकांसाठी आव्हानात्मक काम असतं. वजन घटवण्यासाठी डाइटपासून जिमपर्यंत मेहनत घेतली जाते. एका २४ वर्षीय मुलाने ८४ दिवसांत जे काही केले त्यामुळे त्याचे जवळपास ४० किलो वजन कमी झालं. या मुलाच्या फिटनेस जर्नीबाबत एका वृत्तवाहिनीनं मुलाखत घेतली. त्याने वजन कमी कसं केले? कुठले डाइट केले याबाबत जाणून घेऊया.
नाव - अर्जुन शाह(Arjun Shah)
वय - २४ वर्ष
शहर - कानपूर, उत्तर प्रदेश
वजन - एकूण १०४ किलो
कमी केलेले वजन - ४० किलो
अर्जुन शाहने सांगितले की, मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझं वजन वाढण्यास सुरुवात झाली. मी कुठल्याही खेळाच्या स्पर्धेत भाग घेतल्यावर माझी खिल्ली उडवली जायची. लोक माझी चेष्टा करायचे. पोट वाढल्यामुळे अनेकजण मस्करी करायचे. माझ्या शालेय जीवनात मला कधीच एन्जॉय करता आले नाही. मी १२ वीत असताना माझी एक गर्लफ्रेंड बनली. मी ढिला टीशर्ट घालायचो जेणेकरून माझे वाढलेले वजन दिसू नये. सर्व व्यवस्थित सुरू होतं. तेव्हा गर्लफ्रेंडनं मुले शर्टमध्ये चांगले दिसतात असं म्हटलं परंतु माझ्या वाढलेल्या वजनामुळे मी शर्ट घालत नव्हतो.
तसेच त्यानंतर माझ्या गर्लफ्रेंडने हळूहळू माझ्याशी बोलणं कमी केले. माझ्या वजनामुळे मला जाड्या बोलत तिने दुसऱ्याला डेट करायला सुरुवात केली. त्यादिवशी माझं मन दुखावलं. हाच दिवस माझ्या ट्रांसफॉर्मेशनचा पहिला दिवस ठरला. मला फिट व्हायलाच लागेल असं मी ठरवलं. मी पहिल्या दिवशी जिममध्ये १७ मिनिटे व्यायाम केला. त्यानंतर वेळ वाढवला. दीड वर्षात माझं वजन १०४ किलोहून ५९ किलोपर्यंत कमी झाले असं अर्जुनने म्हटलं.
दरम्यान, माझ्या कोचने मला सिंपल डाइट दिली होती ती मी फॉलो करत होतो. मी सकाळी उठल्यावर ब्लॅक कॉफी प्यायचो त्यानंतर व्यायाम करायचो. सोया चंकच्या पीठापासून बनलेली रोटी खायचो. त्यामुळे मला प्रोटीन मिळायचे. रोटी पनीर बुर्जी खात होतो. त्यानंतर संध्याकाळी स्कूप प्रोटीन शेक आणि रात्री पुन्हा लंच रिपीट करायचो. हिरव्या भाज्या डाइटमध्ये समावेश होत्या. त्याशिवाय मी कुठलेही डाइट केले नाही आणि माझे वजन कमी होत गेले असंही अर्जुनने सांगितले.