बायकोचा वाढदिवस विसरणं इथे आहे गुन्हा, पाच वर्ष तुरूंगवासाची होऊ शकते शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:37 PM2023-02-13T13:37:30+5:302023-02-13T13:49:12+5:30

Husband gets jailed for forgetting birthday of wife : एक असाही देश आहे जिथे बायकोचा वाढदिवस विसरणं गुन्हा आहे. कायदेशीर कायदा बनून हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. अशा पुरूषांना पाच वर्षाचा तुरूंगवास अशी शिक्षा होऊ शकते. 

Weird laws of samoa husband gets jailed for forgetting birthday of wife | बायकोचा वाढदिवस विसरणं इथे आहे गुन्हा, पाच वर्ष तुरूंगवासाची होऊ शकते शिक्षा

बायकोचा वाढदिवस विसरणं इथे आहे गुन्हा, पाच वर्ष तुरूंगवासाची होऊ शकते शिक्षा

googlenewsNext

Husband gets jailed for forgetting birthday of wife : लग्न झालेल्या लोकांना पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवणं किती महत्वाचं आहे. कारण जे तुम्ही ही तारीख विसरले तर हे किती महागात पडू शकतं याचा तुम्हाला अंदाज नाही. अनेकदा अशाही घटना ऐकायला मिळतात की, जर पत्नीचा वाढदिवस लक्षात राहिला नाही तर त्या घरही सोडून गेल्या. अनेक महिला तर अनेक महिने आपल्या पतीसोबत बोलत नाहीत. पण एक असाही देश आहे जिथे बायकोचा वाढदिवस विसरणं गुन्हा आहे. कायदेशीर कायदा बनून हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. अशा पुरूषांना पाच वर्षाचा तुरूंगवास अशी शिक्षा होऊ शकते. 

हा देश आहे सामोआ. आपल्या सुंदरतेसाठी जगभरात फेमस असलेला हा देश नेहमीच आपल्या अजब कायद्यांमुळे चर्चेत असतो. इथे कायदे फार कठोर असतात आणि त्यांचं पालनही इथे सक्तीने केलं जातं. इथे जर कुणी चुकूनही आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरलं तर त्याला वार्निंग दिली जाते. जर त्याने पुढच्या वेळी चूक केली तर त्याला दुप्पत दंड भरावा लागू शकतो किंवा तुरूंगात जावं लागतं. पत्नीने तक्रार केली तर त्याला पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते.

केवळ सामोआमध्येच अजब कायदे नाहीत. जगातल्या अनेक देशांमध्ये अजब कायदे आहेत ज्याबाबत वाचून तुम्ही पोटधरून हसाल. यातील अनेक कायदे हे जुने आहेत. जे आजही बदलण्यात आलेले नाहीत. नॉर्थ कोरियामध्ये निळ्या रंगाची जिन्स घालून बाहेर पडणं बेकायदेशीर आहे.

पूर्व आफ्रिकामध्ये लोक जॉगिंगला जाऊ शकत नाहीत. कारण यावर इथे बंदी आहे. ओक्लाहोमामध्ये राहत असताना जर तुम्ही श्वानाला बघून वेगळे हावभाव केले तर तुम्हाला तुरूंगात जावं लागू शकतं. जर्मनीच्या एका शहरात हाईवेवर प्रवासादरम्यान इंधन संपल्यावर गाडी रस्त्यात सोडली तर तुम्हाला तुरूंगात जावं लागू शकतं. 

Web Title: Weird laws of samoa husband gets jailed for forgetting birthday of wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.