लग्नात आलेल्या मित्राच्या नवरी पडली प्रेमात, मग झालं असं काही विश्वास बसणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 10:09 AM2023-06-17T10:09:06+5:302023-06-17T10:09:49+5:30
Relationship : लग्नाच्या चार वर्षानंतर केरी स्विंटनचं लग्न मोडलं आणि ती तिच्या मुलीसोबत एकटी राहत होती. यादरम्यान पियाओ घेऊन जाण्यासाठी तिला एका गाडीची गरज होती.
Relationship : प्रेम आणि नातेसंबंधांच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येतात आणि त्या वाचून लोक हैराण होतात. अशीच एक अवाक् करणारी एक घटना समोर आली आहे. ब्रिटनच्या स्विंटनसोबत तिच्या लग्नाच्या दिवशीच असं काही घडलं ज्याची तिने कल्पहनाही केली नसेल.
जून 2011 मध्ये तिचं लग्न झालं. लग्नात 110 पाहुण्यांना बोलवण्यात आलं होतं. ज्यात 20 वर्षीय मार्क टेलरचंही नाव होतं. त्यावेळी तिला याचा जराही अंदाज नव्हता की, काही वर्षाने तो तिचा जोडीदार होणार आहे आणि ती त्याचा जीव वाचवणार आहे.
लग्नाच्या चार वर्षानंतर केरी स्विंटनचं लग्न मोडलं आणि ती तिच्या मुलीसोबत एकटी राहत होती. यादरम्यान पियाओ घेऊन जाण्यासाठी तिला एका गाडीची गरज होती. ती गाडीचा शोध घेत होती तेव्हाच तिला फेसबुकवर मार्क टेलरची कंपनी दिसली. दोघांची पुन्हा भेट झाली आणि दोघांची जवळीक वाढली.
मार्कला माहीत होतं की, केरीचं लग्न झालं आहे. त्यामुळे तो तिच्या जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत नव्हता. पण मग बोलता बोलता केरीने त्याला सांगितलं की, ती एकटी राहते. नंतर केरीने त्याला सांगितलं की, ती त्याला नेहमीच पसंत करत होती. पण तिला हे माहीत नव्हतं की, तो सिंगल आहे वा नाही. रोज दोघांचं बोलणं सुरू झालं होतं. एक दिवस तो केरीच्या घरी बुके घेऊन गेला आणि तिला त्याने डेटला चलण्यासाठी विचारलं. केरीनेही त्याला नकार दिला नाही. त्यानंतर त्यांचं नातं सुरू झालं. केरी म्हणाली की, मला विश्वास बसत नव्हता की, जो तरूण माझ्या लग्नात आला होता, तो आता माझा जोडीदार आहे.
यादरम्यान आणखी एक घटना घडली. मार्कला पॉलीसिस्टिक किडनी नावाचा जेनेटिक आजार झाल्याचं समजलं. त्याची किडनी फेल झाली होती. नाकातून रक्त वाहत होतं. डॉक्टरांनी किडनी ट्रांसप्लांट करण्यास सांगितलं. केरी म्हणाली की, मी लगेच डॉक्टरांना म्हणाले की, माझी किडनी घ्या. पण डॉक्टर म्हणाले की, किडनी मॅच व्हायला हवी. मी फार चिंतेत होती. टेस्ट झाल्यावर समजलं की, माझी किडनी मॅच झाली. किडनी ट्रांसप्लांट करण्यात आली. आता माझ्या अवयवासोबत तो पूर्ण जीवन जगेल. सर्जरी यशस्वी झाली.