रोज रात्री शेजारच्या फ्लॅटमधून येतात विचित्र आवाज, कपलच्या 'कारनाम्या'ने उडाली महिलेची झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 12:51 PM2021-11-04T12:51:30+5:302021-11-04T12:53:32+5:30
एका महिलेने तिच्या शेजाऱ्यांबाबत अजब हैराण करणारी तक्रार केली आहे. या महिलेने शेजाराचा 'कारनामा' सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
साधारणपणे अपार्टमेंट्समध्ये राहणाऱ्या लोकांना शेजाऱ्यांबाबत समस्या असते की, त्यांच्याकडे रिनोव्हेशनचं काम सुरू असतं किंवा फर्नीचर शिफ्ट करणं सुरू असतं त्यामुळे डिस्टर्ब होतं. पण एका महिलेने तिच्या शेजाऱ्यांबाबत अजब हैराण करणारी तक्रार केली आहे. या महिलेने शेजाराचा 'कारनामा' सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
शेजाऱ्यांना वैतागली महिला
यूके (UK) मध्ये नॉर्थ लंडनमध्ये (London) राहणारी Shay नावाच्या महिलेने Nextdoor app वर हैराण करणारा एक्सपीरिअन्स शेअर केला आहे. महिलेने सांगितलं की, ती तिच्या शेजाऱ्यांना इतकी वैतागली आहे की, शांतपणे झोपूही शकत नाही. तिला सकाळी ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठावं लागतं. पण शेजाऱ्यांच्या कारनाम्यांमुळे तिची झोपच पूर्ण होत नाही.
झोपेचं होतं खोबरं
The Sun च्या रिपोर्टनुसार महिला म्हणाली की, तिच्या फ्लॅटच्या वरच्या फ्लोरवर एक नवीन कपल राहतं. ज्यांनी तिची झोप उडवली आहे. महिलेने सोशल मीडियावरून शेजाऱ्यांवर टिका केली आहे. तिने लिहिलं की, शेजाऱ्यांच्या फ्लॅटमधून रात्री कमीत कमी चार वेळा विचित्र आवाज येतात. शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कपलला याची अजिबात चिंता नाही की, त्यांचा आवाज आजूबाजूच्या घरातही जातो. महिलेने शेजारी प्लॅटमध्ये राहत असलेल्या तरूणीवर नाराजी व्यक्त केली आहे, कारण तिचाच आवाज जास्त असतो.
काय आहे कारण?
महिलेने दावा केला आहे की, नेहमीच हे आवाज सकाळी ३ वाजतापासून ५ वाजता दरम्यान येतात. तिचा दावा आहे की, असं तेव्हा होतं तेव्हा कपल शरीरसंबंध ठेवतं. तिचा दावा आहे की, रात्रभर कमीत कमी ४ वेळा हे आवाज रोज येतात. तिने लिहिलं की, ती थकून सायंकाळी ७ वाजता आपल्या घरात येते आणि शेजारच्यांच्या कारनाम्यामुळे तिची झोप पूर्ण होत नाही.