महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होत होती वेदना, चेकअप केल्यावर समोर आलं धक्कादायक सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 01:22 PM2022-03-18T13:22:29+5:302022-03-18T13:23:01+5:30

Africa Weird News : तशी तर ही पहिली घटना नाही ज्यात महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून विचित्र वस्तू अडकल्याची घटना समोर आली. पण त्या केसेस वेगळ्या होत्या.

Weird News : Glass stuck in woman bladder for 4 years removed in Tunisia | महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होत होती वेदना, चेकअप केल्यावर समोर आलं धक्कादायक सत्य!

महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होत होती वेदना, चेकअप केल्यावर समोर आलं धक्कादायक सत्य!

googlenewsNext

Africa Weird News : जगात सतत अशा काही विचित्र घटना घडत असतात ज्या वाचून लोक हैराण होत असतात. सोशल मीडियावर अशा घटनांची नेहमीच चर्चा होत असते. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. आफ्रिकेतील एका देशात महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून ऑपरेशन करून अशी वस्तू काढण्यात आली जी बघून डॉक्टरही हैराण झाले. तशी तर ही पहिली घटना नाही ज्यात महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून विचित्र वस्तू अडकल्याची घटना समोर आली. पण त्या केसेस वेगळ्या होत्या.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, तुनीसियाच्या ४५ वर्षीय एक एक महिला नेहमीच असा दावा करत होती की, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हलकी वेदना होते आणि तिला पुन्हा पुन्हा लघवी करायला जावं लागतं. तिला वाटत होतं की तिला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे. त्यामुळे ती डॉक्टरकडे चेकअप करण्यासाठी गेली. चेकअप केल्यावर समजलं की तिला काही सामान्य इन्फेक्शन झालेलं नाही. तिच्या शरीरात ८ सेंटीमीटर लांब ब्लाडर स्टोर आढळला. जो बघून डॉक्टर हैराण झाले.

ब्लाडरमध्ये अडकला होता ग्लास

पण जेव्हा डॉक्टरांनी आणखी लक्ष देऊन पाहिलं आणि स्टोन बाहेर काढला तर वेगळंच सत्य समोर आलं. तुनीसियाच्या सफाक्स शहरात हबीब बॉर्ग्यूईबा यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये ही घटना समोर आली. ब्लाडर स्टोन एक काचेचा ग्लास होता जो महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होता. तो ब्लाडरपर्यंत पोहोचला होता. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, काही वर्षाआधी महिलेसोबत लैंगिक अत्याचार करताना हा ग्लास तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला गेला असेल. पण याचा काही ठोस पुरावा नाही आणि महिलेने याबाबत काही सांगितलं नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेच्या यूरिनमध्ये रेड ब्लड सेल रेंज २३ त २५ होती. तिच सामान्य लोकांच्या यूरिनमध्ये ४ किंवा त्यापेक्षा कमी असते. महिलेच्या शरीरातील ग्लास ओपन सर्जरीच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आलाय. हे ऑपरेशन २०२१ च्या शेवटी करण्यात आलं होतं. सांगितलं जात आहे की, महिलेची तब्येत आता ठीक आहे.
 

Web Title: Weird News : Glass stuck in woman bladder for 4 years removed in Tunisia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.