इथे लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीची आई तिच्यासोबत रूममध्ये असते, ही प्रथा वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:32 AM2022-09-19T11:32:20+5:302022-09-19T11:32:43+5:30

Unique marriage traditions: इतर लोकांना त्यांच्या रितीरिवाजाबाबत फारशी माहिती नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत त्यांच्याकडे अशी प्रथा आहे ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. 

Weird tradition for first night in african marriage, you should know this | इथे लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीची आई तिच्यासोबत रूममध्ये असते, ही प्रथा वाचून बसेल धक्का...

इथे लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीची आई तिच्यासोबत रूममध्ये असते, ही प्रथा वाचून बसेल धक्का...

Next

Unique marriage traditions: जगभरात लग्नाबाबत वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात. यातील काही प्रथा इतक्या विचित्र असतात की, आपला विश्वासही बसत नाही. आफ्रिकेच्या अनेक देशांमध्ये आजही आदिवासी लोकांमध्ये अनेक वेगळ्या प्रथा आहेत. या लोकांचं जगणं फारच वेगळं आणि अद्भुत आहे. इतर लोकांना त्यांच्या रितीरिवाजाबाबत फारशी माहिती नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत त्यांच्याकडे अशी प्रथा आहे ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. 

काळानुसार इतर देशांमध्ये वेगवेगळ्या प्रथांबाबत बदल बघायला मिळतो, पण आफ्रिकेतील काही लोकांमध्ये विचित्र प्रथा अजूनही पाळल्या जातात. एक अशीच वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे. वेगवेगळ्या समाजातील लोक ही प्रथा फॉलो करतात. ही प्रथा लग्नाच्या पहिल्या रात्रीसंबंधी आहे. इथे लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी नवरदेवासोबत नवरीची आई त्यांच्यासोबत रूममध्ये राहते.

'furtherafrica.com' प्रकाशित वृत्तानुसार, लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाची सासू त्यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये राहते आणि त्यांच्यासोबत झोपते. जर नवरीचा आई नसेल तर आजूबाजूच्या एखाद्या वयोवृद्ध महिलेला तिथे ठेवलं जातं. यामागे अशी मान्यता आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीची आई किंवा एखादी वृद्ध महिला कपलला सुखी वैवाहिक जीवनाचे धडे देते. हीच मेंटर म्हणजे आई मुलीला हे सांगते की, या रात्री काय आणि कसं करायचं.

दुसऱ्या दिवशी सकाळी नवरी आणि नवरदेवाच्या रूममध्ये राहिलेल्या महलेला परिवारातील इतर सदस्यांना हे सांगावं लागतं की, रात्री सगळं काही ठीक होतं. या मेंटरच्या या रिवाजाकडे निर्लज्जपणा नाही तर एक रिवाज म्हणून पाहिलं जातं. ज्याचं पालन आजही केलं जातं. अशाप्रकारे मानलं जातं की, नवविवाहित जोडप्याने त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरूवात चांगल्याप्रकारे केली आहे.

Web Title: Weird tradition for first night in african marriage, you should know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.