अंत्य संस्कारानंतर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:46 PM2022-01-17T14:46:09+5:302022-01-17T14:49:16+5:30
Weird tradition of Yanomami family : हे वाचल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल, पण ही बाब या लोकांसाठी सामान्य आहे. काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जातो की, या जमातीतील लोक आपल्या परिवारातील मृत लोकांचं मांसही खातात.
Weird tradition of Yanomami family : जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील लोक वेगवेगळ्या परंपरांचं पालन करतात. काही देशांमध्ये इतक्या अजब परंपरा असतात की, वाचूनच हैराण व्हायला होतं. जगात अंत्य संस्कारही वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. दक्षिण अमेरिकेतील एका जमातीत मनुष्याच्या अंत्य संस्कारानंतर राखेचं सूप बनवून पितात. या जमातीचं नाव यानोमानी आहे.
हे वाचल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल, पण ही बाब या लोकांसाठी सामान्य आहे. काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जातो की, या जमातीतील लोक आपल्या परिवारातील मृत लोकांचं मांसही खातात. चला जाणून घेऊ या लोकांच्या परंपरांबाबत.
दक्षिण अमेरिकेत यानोमानी जमातीचे आदिवासी लोक राहतात. जगात या जमातीला यानम किंवा सेनेमा नावानेही ओळखलं जातं. दक्षिण अमेरिकेसोबतच ही जमात व्हेनिजुएला आणि ब्राझीलमध्येही आढळते. या आदिवासी जमातीच संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा वेगळी आहे.
कसा केला जातो अंत्य संस्कार
या लोकांमध्ये अंत्य संस्कार करण्याची अजब परंपरा आहे. या परंपरेला एंडोकॅनिबेलिज्म असं म्हटलं जातं. या परंपरेचं पालन करण्यासाठी हे लोक आपल्या परिवारातील मृत व्यक्तीचं मांस खातात. एका मीडिया रिपोर्टनुसार, या जमातीत जर कुणाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचा मृतदेह पानांनी आणि इतर काही वस्तूंनी झाकून ठेवला जातो. त्यानंतर ते शरीर वाचतं ते जाळलं जातं. नंतर त्या राखेचं सूप बनवून लोक पितात.
का करतात असं?
यानोमानी जमातीतील लोक मृतदेहासोबत असं करतात कारण त्यांची अशी मान्यता आहे की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्त्याचं रक्षण केलं पाहिजे. या जमातीत अशी धारणा आहे की, एखाद्याच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळते जेव्हा त्याचं शरीरात नातेवाईक खातील. त्यामुळे हे लोक अंत्य संस्कारानंतर राख कोणत्या ना कोणत्या प्रकारे खातात.
एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीची हत्या वैरी किंवा एखादा नातेवाईक करत असेल तर त्यांचा अंत्य संस्कार वेगळ्या प्रकारे केला जातो. या स्थितीत केवळ महिलाच राख खातात.
हे पण वाचा :
भिकाऱ्याचे रोल्स करणारा ज्युनिअर आर्टिस्ट कसा झाला जगप्रसिद्ध 'प्रोफेसर'?