स्वतःच बनला इंजिनीअर अन् गवंडी; शेतकऱ्यांने उभारले 'टायटॅनिक'सारखे घर, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 07:55 PM2023-11-02T19:55:24+5:302023-11-02T19:57:59+5:30
हे घर पाहण्यासाठी मोठी गर्दी जमत असते.
West Bengal: मनात जिद्द असेल, तर कुठलेही काम अवघड नसते. याच जिद्दीतून बिहारच्या दशरथ मांझी यांनी डोंगर चिरुन रस्ता बनवला. पश्चिम बंगालमधीलशेतकरी मिंटू रॉय यांनीही असेच काहीसे काम केले आहे. मिंटू यांनी चक्क टायटॅनिक जहाजाच्या आकाराचे घर बांधले आहे. हे अनोखे घर पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमत आहे.
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात राहणाऱ्या मिंटू रॉय यांनी चक्क टायटॅनिक जहाजासारखे घर बांधले आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी जहाजाच्या आकाराचे घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. शेती करत असतना त्यांनी आपला जोपासला आणि आपल्या स्वप्नातील घर बांधण्यास सुरुवात केली. मात्र, त्यासाठी एकही इंजिनीअर तयार झाला नाही.
कुणाची मदत मिळत नसल्यामुळे त्यांनी स्वत: घर बांधण्याचे तयारी केली. पैशाअभावी घरातील अनेक कामे अर्धवट सोडून द्यावी लागली. मिंटू यांच्याकडे गवंडीला देण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतः गवंडी म्हणून काम केले. 2010 पासून त्यांनी हे घर बांधण्यास सुरुवात केली. हे जहाजासारखे घर 39 फूट लांब, 13 फूट रुंद आणि 30 फूट उंच आहे. आता हे अनोखे घर पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमते.