घरातून काम करत असताना ऑफिसच्या खुर्चीऐवजी कशाचा वापर करतात लोक? जाणून घ्या उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 11:41 AM2021-03-19T11:41:01+5:302021-03-19T11:46:53+5:30
लोक घरातून ऑफिसचं काम करत असताना बसण्यासाठी कशाचा वापर करतात? असा प्रश्न @onemillionit या ट्विटर पेजवर विचारण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा हैदोस गेल्या वर्षभरापासून जास्त काळ सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. आता वर्क फ्रॉम होम करायचं म्हटलं तर अर्थातच घरात ऑफिससारखा सेटअप सगळ्यांकडेच असेलच असं नाही. ऑफिससारखी खुर्चीही सगळ्यांकडे असेलच असं नाही. मग अशात लोक घरातून ऑफिसचं काम करत असताना बसण्यासाठी कशाचा वापर करतात? असा प्रश्न @onemillionit या ट्विटर पेजवर विचारण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी उत्तरे दिली आहेत.
घरात बसून काम करणं आधी सर्वांनाच मजेदार आणि सोयीचं वाटलं. पण घरात बसून काम करण्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्याही अनेकांना भेडसावत आहे. अनेकांना पाइल्सची समस्या होत आहे. अनेकांना कंबरदुखी आणि इतर समस्या होत आहेत. कारण ऑफिससारखी सोय घरात असतेच असं नाही. त्यामुळे घरात लोक काम करताना बसण्यासाठी कशाचा वापर करतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. @onemillionit वर हाच प्रश्न विचारण्यात आला असून सोबतच चार पर्यायही दिले आहेत. ज्यात बेड, सोफा, रेग्युलर खुर्ची आणि ऑफिसचा सेटअप यांचा समावेश आहे.
या सर्व्हेमध्ये लोकांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहे. यातील सोफ्याचा वापर करत असल्याचं १५.६ टक्के लोकांनी सांगितलं आहे. तर बेडचा म्हणजे बेडवर बसून ऑफिसचं काम करण्याच्या पर्यायाला ३०.३ टक्के लोकांनी उत्तर दिलं आहे. तसेच रेग्यलर खुर्चीचा वापर २६.६ टक्के लोक करतात असं दिसलं. तर २७.५ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्याकडे प्रॉपर ऑफिससारखा सेटअप आहे.
म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी बेड या पर्यायाला निवडलं आहे. म्हणजे लोक घरातून काम करत असताना बेडवर बसून काम करतात. तर केवळ २७ टक्के लोकांकडेच घरात ऑफिससारखा सेटअप आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोक हे घरातून काम करत असताना अॅडजस्ट करून काम करतात.